सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका! हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढत केली नवीन लोकांची भरती

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. वलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी कामावर आलेले नाहीत.

कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन केले जात आहे. पण कर्मचारी काही ऐकायला तयार नाहीत. कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने अखेर अखेर संपकऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरूवात केली असून शुक्रवारी महामंडळाने रोजंदारीवरील २३८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आणि २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

महामंडळाने आतापर्यंत २ हजार ७७६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच महामंडळाने धुळे, जळगाव येथे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर घेण्यास सुरूवात केली आहे. सोमवारपासून हे चालक महामंडळात कामावर रूजू होणार आहेत.

आवाहन करूनही कर्मचारी कामावर येत नसल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खुपच कमी आहे. त्यामुळे महामंडळाने ही कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण राज्यात दोन हजारापेक्षा जास्त कर्मचारी महामंडळात रोजंदारीवर काम करतात.

त्यामध्ये चालक आणि वाहक दोघांचाही समावेश आहे. संपात या कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना २४ तासांचे अल्टीमेटम देण्यात आले होते पण तरीही कर्मचारी कामावर आले नाहीत. त्यामुळे अशा २३८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून त्यांना कमावरून निलंबित करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांकडून असे सांगण्यात येत आहे की, एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण केले तर आम्हाला शासनाच्या सेवा व सुविधा मिळतील. विविध कर कमी होतील. १० ते १२ हजार पगारावर एसटीचे कर्मचारी काम करतात. यासाठी एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या
सिक्सर मारल्यामुळे संतापला शाहीन आफ्रिदी, फलंदाजाला बॉल मारुन केली दुखापत; पहा व्हिडिओ
‘शेतकऱ्यांची माफी मागून नरेंद्र मोदींनी दाखवली नम्रता; काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतूक
थेट व्हिडीओच पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांनी उघड केले शरद पवारांचे खोटे वक्तव्य
रेकॉर्ड स्तरापेक्षा 3000 रुपयांनी स्वस्त मिळतय सोनं, जाणून घ्या कुठे मिळतेय ही ऑफर..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.