माझी सुपारी देण्यात आली होती; आत्महत्येचा विचारही मनात आला- उदित नारायण

मुंबई | बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना नुकतीच इंडस्ट्रीमध्ये ४० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांनी आपले एक youtube चॅनेल खोलले आहे.

चाळीस वर्षे झाली तरी त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. त्यांना अनेक गाण्यांसाठी पुरस्कार मिळाले. जीवनात त्यांनी अनेक अडचणी पहिल्या. एकदा तर त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता.

त्यांनी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात ते असं बोलले आहेत. गाण्यात करिअर करायचं म्हणून त्यांनी मुंबईत प्रवेश केला. पण त्यांना त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.

१९८० च्या दरम्यान आम्ही आम्ही एकाच खोलीत ६-७ जण राहत होतो. टॅलेंट असतानाही अनेक संगीतकारांकडे काम मागण्यासाठी जावं लागायचं. त्यानंतर गाण्याची संधी मिळायची.

कायामत से कायामत तक या चित्रपटानंतर मला माझ्या कष्टाचं फळ मिळालं. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. पण कुछ कुछ होता है हिट झाल्यानंतर मला खंडणीसाठी फोन येऊ लागले. त्यावेळी मी मुंबई पोलिसांची मदत घेतली.

त्यांनी माझी मदत केली. मला खूप असुरक्षित वाटत होत. मला करण्याचाही कट रचण्यात आला होता. माझी सुपारी देण्यात आली होती. मी खुप पैसे कमवत होतो याच्यातलाही काही भाग नव्हता. मला जशी गाणी भेटत होती तशी मी गात होतो.

मी कधी कोणाला त्रास दिला नाही तरी देखील मला त्रास देण्याचं काम सुरूच होत. माझं लक्ष विचलित करण्याचं काम चालू होतं जेणेकरून मला गाणं गाता येणार नाही. अनेकदा मी रडलो, मला प्रचंड मनस्ताप होत होता.

अनेकदा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला पण माझे चाहते नेहमी माझ्यासोबत राहिले त्यांनी मला प्रचंड प्रेम दिले आहे. असं उदित नारायण मूलखतीत म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.