तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत ? जरा थांबा ही बातमी वाचा..

मुंबई | ‘कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याकडून कोरोना पसरण्याची जास्त शक्यता असते,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली जिमखान्यातील बास्केटबॉल हॉलच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे आॅनलाइन लोकार्पण करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाचे रुग्ण सुरुवातीला सापडत असताना राज्यात केवळ दोन लॅब होत्या. आता गेल्या चार महिन्यांत राज्यभरातील कोरोना टेस्टिंग लॅबची संख्या 285 झाली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, 24 मे ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलं आहे की थकवा येणं आणि तोंडाची चव जाणं ही देखील लक्षणं आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.