सुशांतचे दाजी झाले भावूक! सांगितला सुशांतबद्दलचा ‘तो’ किस्सा..

मुंबई : सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या करून सुमारे तीन महिने उलटून गेले आहे. मात्र सुशांतचे लाखो चाहते अजूनही त्याचे जुने फोटो सोशल मिडीयावर शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

अशीच आठवण सुशांतचे दाजी विशाल किर्ती यांनी काढली आहे. यांनी एक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. तसेच जेव्हा श्वेता आणि विशाल यांचे प्रेमसंबंध सुशांतला समजले तेव्हा सुशांतने काय प्रतिक्रिया दिली हे देखील त्यांनी सांगितले आहे.

याबाबत विशाल सांगतात जेव्हा आमच्या दोघांचे प्रेमसंबंध सुशांतला समजले तेव्हा सुशांत एका टिपिकल प्रोटेक्टिव भावाप्रमाणे माझ्या इंटेशनवर प्रश्न उपस्थित करू लागला होता.

त्यानंतर आम्ही सुशांतला सिद्ध करून दिले की, आम्ही दोघे एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहोत. याचप्रमाणे मोठ्या मी यूएसमधून परतलो यानंतर सुशांत मान्य झाला. आणि नंतर २००७ मध्ये मी श्वेतासोबत लग्न केले,’ असे विशालने सांगितले.

दरम्यान, पुढे विशाल म्हणतात, ‘सुशांतच्या मृत्यूला तीन महिने उलटून गेले मात्र अद्याप त्याच्या कुटुंबीयांचे दु:खं तसेच आहे. तसेच आता ब्लॉगच्या माध्यमातून सुशांतसोबतच्या सुंदर आठवणी शेअर करणार असल्याचे विशाल यांनी सुशांतच्या चाहत्यांना सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“हिरोसोबत झोपल्यानंतरच दोन मिनिटांचे आयटम सॉंग किंवा एक रोमँटिक सीन मिळत होता”
फुल्ल भरून धावणार ‘लालपरी’; मात्र एसटीत बसण्यासाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक
सुशांत प्रकरणातील आदित्य ठाकरेंच्या भूमिकेबद्दल रियाने सोडले मौन; म्हणाली..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.