संशोधनातून खुलासा; असा आवाज असणारे पुरुष धोकेबाज असतात, वाचा सविस्तर

दिल्ली | असे बोलतात की माणसाच्या आवाजावरून, बोलण्यावरून आपण त्याचे व्यक्तिमत्त्व ठरवू शकतो. हे जाणून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आले त्यामध्ये बरेच निकष काढण्यात आले.

हे निकष वाचून महिलांनी सावध व्हायला हवे. कारण सहसा बऱ्याच स्त्रियांना जड आवाजाचे पुरुष आवडतात आणि जड आवाजाचे पुरुष हे विश्वास ठेवण्यायोग्य नसतात असे आढळून आले आहे.

ते त्यांच्या जोडीदाराला फसवतात. हा अभ्यास चीनच्या एका साऊथवेस्ट विद्यापीठाने केला आहे. पुरुषांना शब्दांची एक यादी वाचण्यासाठी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या आवाजाची वारंवारता समजून घेण्यात आली आणि पट्टी समजून घेण्यासाठी विश्लेषण करण्यात आले.

नंतर त्यांची मानसिक चाचणी घेण्यात आली. अभ्यासात असे दिसून आले की, जड आवाज असणारे पुरुष वचनबद्ध नसतात आणि ते आपल्या जोडीदाराची फसवणूक करू शकतात.

त्यांच्या आवाज त्यांच्या लैगिंक संप्रेरक टेस्टोस्टेरॉन पातळीमुळे तसा असतो. कर्कक्ष आवाज असणाऱ्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक आहे. टेस्टोस्टेरॉन एखाद्या व्यक्तीची वर्तणूक आणि वैशिष्ट्य निश्चित करू शकतो.

या पुरुषांची मुले ही निरोगी असतात. महिला जोडीदाराच्या आवाजपेक्षा त्यांच्या व्यक्तीमत्वाकडे जास्त लक्ष देतात. स्त्रीला असा जोडीदार हवा असतो जो तिला प्रत्येक कामात पाठिंबा देईल, सहकार्य करेल. हे ही खरे आहे की, जड आवाजाच्या व्यक्तीकडे महिला आकर्षीत होतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.