महादेवाचे हे मंदिर भाविकांच्या डोळ्यांदेखत दिवसातून दोनदा होते गायब; वाचा कशी होते ही जादू..

कुठे, कोणती आणि कशी गोष्ट घडून येईल हे कोणीच, कधीच सांगू शकत नाही. मात्र सगळ्यांपेक्षा वेगळे असते त्याला आश्चर्यकारक गोष्टी म्हणून संबोधले जाते.

आज आपण अशाच एका आश्चर्य वाटणाऱ्या मात्र सत्य परिस्थिती असणाऱ्या मंदिराची गोष्ट पाहणार आहोत. हे मंदिर भगवान शंकराचे असून, हे मंदिर दिवसातून दोन वेळा गायब होऊन पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी आहे त्याच ठिकाणी दिसू लागते.

वाचून तुम्हाला ही थोडे आश्चर्य वाटले असेल मात्र हो! हे सत्य आहे. चला तर मग पाहूयात कोणते आहे हे मंदिर आणि काय आहे या मंदिराचा इतिहास ते.

गुजरातच्या वडोदरा शहरापासून ७५ किमी लांबीवर असणारे व अरबी सागरात कांबे तटावर स्थित असणारे भगवा शंकराचे हे मंदिर आहे. या मंदिराला स्तंभेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते.

या मंदिराच्या मागे एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे, ताडकासूर नावाच्या राक्षसाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले होते. आणि भगवान शंकर प्रसन्न होताच त्या ताडकासूरने अमर होण्याचे वरदान मागितले होते.

तेव्हा भगवान शंकरानी हे वरदान देण्यास नकार दिला. त्यामुळे ताडकासुरुने दुसरे वरदान मागितले की, त्याला फक्त शिवपुत्रच मारू शकेल. की ज्याचे वय फक्त ६ दिवस असेल. बाकी कुणाच्याही हातून ताडकासुरला मरण येणार नाही.

भगवान शंकरानी त्याला हे वरदान दिले. वरदान मिळाल्यांनतर तारकासुरने तिन्ही लोकात हाहाकार माजवायला सुरुवात केली. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून देवता आणि ऋषी मुनींनी भगवान महादेवाकडे धाव घेतली.

तेव्हा उपाय म्हणून कार्तिकेय चा जन्म झाला. आणि कार्तिकेयने जन्माच्या सहाव्या दिवशीच ताडकासूराचा वध केला.

जेव्हा कार्तिकेयला समजले की ताडकासुर त्यांच्या वडिलांचा परमभक्त होता. त्याचा वध केल्यामुळे कार्तिकेय स्वतःला दोषी समजत होता. तेव्हा भगवान विष्णूने त्यावर उपाय सांगितला की, ज्या ठिकाणी ताडकासुराला मारले आहे त्याठिकाणी शिवलिंगाची स्थापना कर आणि महादेवांकडे क्षमा याचना करा.

पुढे कार्तिकेयने सांगितल्या प्रमाणे त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. व पुढे याच शिवलिंगाच्या जागेच्या मंदिराला स्तंभेश्वर महादेव मंदिर म्हणून नाव पडले.

या स्तंभेश्वर महादेव मंदिराची खासियत म्हणजे या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन दिवसातून फक्त एक वेळेसच केले जाऊ शकते. हे मंदिर अरबी सागरात कांबे तटावर स्थित असल्याने, समुद्राला भरती ओहटी येत असते.

अशा वेळी जेव्हा भरती येते तेव्हा, समुद्राचे सर्व पाणी मंदिरात घुसले जाते. भरतीच्या वेळी हे मंदिर संपूर्णपणे जलमय होते. तेव्हा या मंदिरात कोणालाही जाण्यास परवानगी नसते.

जवळजवळ दिवसातून दोन वेळा हे मंदिर अशा रीतीने पूर्णपणे पाण्याखाली जाते. या चमत्कारिक मंदिरात संपूर्ण दिवसभर भक्तांची मोठी गर्दी असते.

तसेच आपल्या डोळ्यसमोर मंदिराला पाण्यात गायब होताना आणि पुन्हा वर येताना पाहण्यासाठी अनेक भक्तजन याठिकाणी नेहमीच येत असतात.

तसेच येथे येणाऱ्या सर्व भक्तांना एक चिट्टी दिली जाते. ज्यावर समुद्राला येणाऱ्या भरतीचा वेळ लिहलेला असतो. भाविकांनी त्या वेळेच्या अगोदर अथवा त्यांनतरच मंदिर परिसरात जाण्याची परवानगी दिली जाते.

तर अशी होती दिवसातून दोन वेळा गायब होऊन जलमय होणाऱ्या भगवान शंकराच्या स्तंभेश्वर मंदिराची गोष्ट.

-निवास उद्धव गायकवाड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.