Share

यशपासून ते महेश बाबूपर्यंत, आपल्याच को-स्टार्सच्या प्रेमात पडले ‘हे’ अभिनेते, काहींनी तर केलंय लग्न

सध्या बॉक्स ऑफिसवर साऊथ चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे साऊथ चित्रपटातील कलाकारही चर्चेत आले आहेत. ‘KGF Chapter 2’, ‘RRR’ आणि ‘पुष्पा’ हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे फक्त दक्षिणेतील कलाकारांचीच चर्चा होत आहे. यश, अल्लू अर्जुन, एनटीआर आणि रामचरण हे दक्षिणेतील सुपरस्टार भारतात अतिशय लोकप्रिय झाले आहेत.(this superstar marraige with their costar)

भारतीय चाहत्यांना या इंडस्ट्रीशी संबंधित कलाकारांबद्दल अधिकाधिक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आज आम्ही तुम्हाला साऊथ इंडस्ट्रीतील अशाच काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या सहकलाकारांसोबत लग्न केले आहे. आज आम्ही तुम्हाला साऊथ इंडस्ट्रीतील काही पॉवर कपलबद्दल माहिती देणार आहोत.

‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटात रॉकी भाईची भूमिका करणारा अभिनेता यशने २०१६ साली अभिनेत्री राधिका पंडितसोबत लग्न केले. राधिका आणि अभिनेता यशची भेट ‘नंदगोकुल’ या शोच्या सेटवर झाली होती. यश आणि राधिकाने ‘मिस्टर अँड मिसेस रामचारी’ आणि ‘रॅम्बो स्ट्रेट फॉरवर्ड’ यासह काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

साऊथ इंडस्ट्रीत अभिनेता महेश बाबू हा खूप मोठा सुपरस्टार आहे. त्याच्या चित्रपटांची दक्षिणेत फार चर्चा असते. २००५ मध्ये अभिनेता महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकर सोबत लग्न केले आहे. दोघांची पहिली भेट ‘वंशी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. अभिनेत्री नम्रता शिरोडकर अभिनेता महेश बाबूपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. लग्नापूर्वी त्यांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

साऊथ सुपरस्टार नागार्जुनने १९९२ मध्ये त्याची सहकलाकार अमलासोबत लग्न केले. या दोघांनी ‘किराई दादा’, ‘चिन्ना बाबू’, ‘शिवा’, ‘प्रेम युद्धम’ आणि ‘निर्णयम’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अभिनेता नागार्जुनचे हे दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न लक्ष्मी दग्गुबतीशी झाले होते. लग्नानंतर लगेचच दोघांचा घटस्फोट झाला होता.

अभिनेत्री समंथा अक्किनी आणि अभिनेता नागा चैतन्य हे दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय सुपरस्टार आहेत. या दोघांची जोडी देखील चाहत्यांना फार आवडते. अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांची पहिली भेट ‘मैया चेसावे’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटादरम्यान दोघेही दुसऱ्या व्यक्तींना डेट करत होते.

त्यानंतर दोघांनी ‘सुर्या’ चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर २०१७ मध्ये अभिनेत्री समंथा अक्किनी आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी लग्न केले. पण २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आहे. अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘पूवेलम केट्टुपर’ या चित्रपटात अभिनेता सुर्या आणि अभिनेत्री ज्योतिका पहिल्यांदा एकत्र दिसले होते. ज्योतिकाचा हा तिसरा चित्रपट होता. चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि नंतर दोघांच्या भेटीगाठी देखील वाढू लागल्या. २००६ मध्ये अभिनेता सुर्या आणि अभिनेत्री ज्योतिका यांनी लग्न केले. ज्योतिका आणि सूर्या यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे दीया आणि देव अशी आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; गाडीत होते ‘हे’ मराठी अभिनेते
नेतेमंडळींवर हजारोंचा वाहतूक दंड, चंद्रकांत पाटील म्हणाले घरंदारं विकायची वेळ येईल
टेम्पो चालकाचा मुलगा MPSC मध्ये महाराष्ट्रात आला पहिला, पुर आला तरी सोडला नाही अभ्यास

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now