रशिया युक्रेन युद्धापासून शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात नेहमीच असे काही स्टॉक असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. असाच एक स्टॉक SEL Manufacturing Company Ltd. कंपनीचा आहे.(this stock gives huge return and make investor millioner)
या स्टॉकने केवळ पाच महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवण्याचे काम केले आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सतत नफ्यात असतात. या स्टॉकने गेल्या पाच महिन्यात १ लाख ३७ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. हा परतावा पाहून गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत.
आज देखील या स्टॉकमध्ये ४.९९ टक्क्यांची वाढ झाली आहे. पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच २७ ऑक्टोबर २०२१ रोजी या कंपनीचे स्टॉकची किंमत NSE वर प्रति शेअर ३५ पैसे होती. पण १५ मार्च २०२२ रोजी या शेअरची किंमत ३५ पैशांवरून ४८०.३५ रुपयांवर पोहचली आहे. या कालावधीत या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे १३७,१४२.८६ टक्के परतावा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शेअरने आतापर्यंत ९८१.८७% परतावा दिला आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी या शेअरची किंमत ४४.४० रुपये प्रति शेअर होती. एका महिन्यापूर्वी या शेअरची किंमत NSE वर १९९.९० रुपये होती. आता त्या शेअरची किंमत वाढून ४८०.३५ रुपये झाली आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १४०.३० टक्के परतावा दिला आहे.
यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये हा स्टॉक २१.५३ टक्क्यांनी वाढला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये सहा महिन्यांपूर्वी ३५ पैसे प्रति शेअर दराने एक लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज ती गुंतवणूक १३.७२ कोटी रुपये झाली असती.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला १०.८१ लाख रुपये मिळाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये एका महिन्यापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज ती गुंतवणूक २.४० लाख रुपये झाली असती.
महत्वाच्या बातम्या :-
‘देवमाणूस’मधील ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, कारण वाचून डोळे पाणावतील
ठाकरे सरकारने जारी केले होळीचे नियम; जाणून घ्या काय आहे सूचना, नाहीतर होईल कडक कारवाई
आता भाजप नेत्यांना महाविकास आघाडीचे झटक्यावर झटके; माजी मंत्र्यावर टाकला फासा






