Share

‘या’ शुगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे आयुष्य झाले गोड, वर्षभरात दिला तब्बल ४४० टक्के परतावा

shear-market

सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात शुगर स्टॉकमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात भारतातील सर्वात मोठ्या साखर कंपन्यांपैकी एक असलेल्या श्री रेणुका शुगर्स लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना(Investor) मोठा परतावा दिला आहे.(this stock gives huge profit to investor)

या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना ४४० टक्के इतका नफा दिला आहे. बुधवारी देखील या समभागात मोठी वाढ झाली आहे. इंट्राडेमध्ये सध्या या शेअरची किंमत ५३.६० रुपये आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक ४० टक्क्यांनी वाढला आहे. 21 मार्च 2022 रोजी या शेअरची किंमत ३७.२५ रुपये होती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये पाच लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक २७ लाख रुपये झाली आहे.

गेल्या एका महिन्यात या शेअरची किंमत प्रत्येकी १६ रुपयांनी वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांत श्री रेणुका शुगर्स लिमिटेड कंपनीचा शेअर ७८ टक्क्यांनी वाढला आहे. 2022 मध्ये, या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ७२ टक्के इतका परतावा दिला आहे. यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणारे लोक मालामाल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडून सध्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल ( EBP) हा कार्यक्रम राबवला जात आहे. भारतातील अतिरिक्त साखरेची परिस्थिती कमी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. २०२५ त २०% इथेनॉल मिश्रित करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अनेक कारखाने उसापासून इथेनॉलचे उत्पादन करत आहे.

यासाठी साखर कारखान्यांना भारत सरकारकडून अनेक प्रकारे मदत दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने इथेनॉल प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत कर्ज वाटपाची मुदत वाढवली आहे. ही मुदत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत करण्यात आली आहे. २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रणाचे सरकारचे लक्ष्य मध्यम ते दीर्घ कालावधीत वाढू शकते.

यामध्ये सुधारणा देखील केली जाऊ शकते, अशी माहिती ब्रोकरेज हाऊस शेअरखानने दिली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. याचा फायदा भारतीय साखर कंपन्यांना मिळत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये भारताच्या साखर निर्यातीत २९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात भारताने ४.६ अब्ज डॉलरची साखर निर्यात केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मलिकांची सुटका नाहीच! आता ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
मैं निकला JCB लेके! पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुजरातमध्ये चढले बुलडोझरवर, पुढं घडलं असं काही..
मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतरचे ‘हे’ ट्विट तुफान व्हायरल; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now