२०२१ वर्षामध्ये अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या वर्षीही अनेक शेअर्स सुरुवातीपासूनच मोठा परतावा देत आहेत. गेल्या ११ महिन्यांत एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. हा शेअर EKI एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीचा आहे. EKI एनर्जी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने मागील १० महिन्यांत लोकांना ७३७५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.(this stock give bumper return to investor)
EKI एनर्जी सर्व्हिसेसने गेल्या वर्षीच त्यांचा IPO शेअर बाजारात आणला होता. या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येकी १०२ रुपये किमतीला शेअर्सचे वाटप केले होते. EKI एनर्जी सर्व्हिसेस ही कार्बन क्रेडिटचे विकसन आणि पुरवठा करणारी कंपनी आहे. आज शेअर बाजारात EKI एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरची किंमत ७,६२५ रुपये आहे.
गेल्या एका महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अधिक विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. या एका महिन्याच्या कालावधीत या कंपनीचा IPO जवळपास १६ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या ६ महिन्यांत हा शेअर १९०० रुपयांच्या किंमतीवरून ७६२५ रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअरच्या किंमतीत जवळपास ३०० टक्के वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये या मल्टीबॅगर शेअरची किंमत सुमारे २६ टक्क्यांनी खाली आली होती. पण गेल्या ११ महिन्यांत या शेअरची किंमत १४० रुपयांवरून ७६२५ रुपयांपर्यंत वाढली आहे. या शेअरच्या किंमतीत जवळपास ४४५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुरवातीला या कंपनीचा IPO १०० ते १०२ रुपये प्रति शेअर या दराने ऑफर करण्यात आला होता.
EKI एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीचा IPO १०२ रुपयांवरून ७६२५ रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुमारे ७३७५ टक्के इतका परतावा मिळत आहे. EKI एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर IPO मध्ये १.२२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि दीर्घकालावधीसाठी ती गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला ९१.५० लाख रुपये मिळाले असते. EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्सचे सध्याचे बाजार भांडवल ५,२४१ कोटी आहे. येत्या काळात हा शेअर गुंतवणूकदारांना आणखी चांगला परतावा देईल, अशी आशा आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: ‘देवमाणूस’मध्ये मोठा ट्विस्ट, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजितकुमारसोबत घडणार ‘ही’ घटना
मला माफ कर.., कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची ‘ही’ पोस्ट वाचली तर डोळे पाणावतील
सेक्स लाईफबाबत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलली दीपिका; म्हणाली, माझ्या मते सेक्स म्हणजे…