Share

साऊथच्या ‘या’ स्टार अभिनेत्याने बाॅलीवूडला लाथ मारून स्विकारली मराठी चित्रपटाची आॅफर

नुकतंच ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या मराठी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मराठी चित्रपटात कन्नड अभिनेता कवीश शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील कन्नड अभिनेता कवीश शेट्टीच्या(Kavish Shetty) डॅशिंग लुकचे सर्वजण कौतुक करत आहेत. अभिनेता कवीश शेट्टीने बॉलीवूड चित्रपट नाकारत मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका स्विकारली आहे. अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटाचे कौतूक केले आहे. (this south star reject bollywood films and accept marathi film)

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाची निर्मिती दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्री या निर्मिती संस्थेने केली आहे. हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत चित्रित करण्यात आला आहे. ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपट मराठीसह कन्नड, तामिळ, तेलगु आणि मल्ल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर या चित्रपटाच्या निर्मात्यांचे कौतुक केले आहे. दिग्दर्शक समित कक्कड, गायिका प्रियांका बर्वे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सोनाली खरे, अभिनेता संदीप पाठक यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच अभिनेत्री तेजस्विनी पंडित, पल्लवी सुभाष आणि दीप्ती देवी यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. साऊथमधील चित्रपट इतर भाषेत डब करून प्रदर्शित केले जात आहेत. आता मराठी चित्रपट देखील इतर भाषांमध्ये डब करून दाक्षिणात्य  राज्यांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात शिवानी सुर्वे, मेघा शेट्टी देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.

या चित्रपटाबद्दल माहिती देताना निर्माते दीपक राणे म्हणाले की, “दाक्षिणात्य सिनेमांनी त्यांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. मराठी सिनेमा देखील आपल्या सीमा ओलांडू शकतो. मराठी सिनेमाविषयी कुतुहूल आणि कौतुक सर्व सिनेसृष्टीत आहे. नवनवीन विषय हाताळण्यात मराठी सिनेमा कुठेच मागे नाही”, असे सिनेमाचे निर्माते दीपक राणे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अक्षयला आधीच कळलं होतं ‘पृथ्वीराज’ फ्लाॅप होणार; दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
थांबायचं नाय गड्या थांबायचा नाय..; दे धक्का २ ‘या’ तारखेला होणार रिलीज; पहा धमाकेदार टिझर व्हिडीओ
‘या’ मुलीमुळे सुशांत सिंग राजपूत 4 रात्री झोपू शकला नाही; ‘असा’ होता त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now