रिया शवगृहात असताना प्रत्यक्षदर्शीने केले ‘हे’ धक्कादायक खुलासे; सीबीआयला सर्व सांगण्यासाठी तयार

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे, आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीबद्दल आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

रिया चक्रवर्ती सुशांतच्या मृत्यू नंतर ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता, त्याठिकाणी बेकायदेशीरपणे गेली होती. रियाच्या या ठिकाणी जाण्यावर सुशांतच्या वकिलांनी आणि अनेक राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

तसेच आता रिया तिथे गेली असताना त्याठिकाणी एक करणी सेनाचा सदस्य सुरजीत राठोड उपस्थित होता. सुशांतचा मृतदेह पाहून रियाची प्रतिक्रिया काय होती याबद्दल त्याने सांगितले आहे.

रियाची सुशांतचा मृतदेह पाहून अशी प्रतिक्रिया होती की या सर्व गोष्टींना तीच दोषी आहे, तसेच तिने सुशांतचा मृतदेह पाहून ‘सॉरी बाबू’ असे म्हटले होते, असे सुरजीतने म्हटले आहे.

तसेच सुशांतच्या आत्महत्येमागे संदीप सिंगचे षडयंत्र आहे, यासाठी मी मुंबई पोलिसांकडे देखील गेलो होतो. त्यांनी मला हे सर्व लेखी लिहून देण्यात सांगितले. मी ते लिहून पण दिले पण त्याचा काही फायदा झाला नाही, असे सुरजीतने म्हटले आहे.

तसेच सीबीआयने माझ्याशी संपर्क साधला तर याबद्दल मला जे काही माहित आहे, ते सर्व मी त्यांना सांगेल. मी सुशांतच्या कुटुंबासोबत आहे आणि सुशांतला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा, असेही सुरजीतने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.