Share

जबरदस्त! ‘या’ २ रुपयांच्या शेअरने दिला छप्परफाड परतावा, गुंतवणूकदार झाले करोडपती

shear market

पेनी स्टॉक(Penny Stocks) चांगला परतावा देतात. त्यांचा रेकॉर्ड देखील उत्कृष्ट आहे. असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यामध्ये फक्त केवळ लाख रुपये गुंतवलेल्या लोकांना करोडोंचा फायदा झाला आहे. असा एक पेनी स्टॉक इंडो काउंट इंडस्ट्रीजचा आहे. काही वर्षांपूर्वी हा शेअर २ रुपयांपेक्षा कमी होता आणि आता तो १७० रुपयांच्या पुढे गेला आहे.(this shear give bumper returns to investor)

इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या समभागांनी(Shear) १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना १३,००० टक्क्यांहून अधिक परतावा(Return) दिला आहे. १६ मार्च २०१२ रोजी शेअर बाजारात इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स १.२६ रुपयांवर होते. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये १७४.५० रुपयांवर बंद झाले.

इंडो काउंट कंपनीच्या समभागांनी १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना १३,८०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने १६ मार्च २०१२ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर ती रक्कम सध्या १. ३८ कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.

८ मे २०२० रोजी शेअर बाजारात इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स २४.४० रुपयांच्या पातळीवर होते. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स १७४. ५० रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सनी २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास ७१५ टक्के परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने ८ मे २०२० रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्या व्यक्तीला ७ लाख रुपये मिळाले असते. इंडो काउंट इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३१४.८० रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची निच्चांकी पातळी ११३ रुपये आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. या काळात मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. पेनी स्टॉक हे खूप स्वस्त असतात आणि ज्यांचे बाजार मूल्य देखील कमी असते. दीर्घकालीन गुंतवणुकीत पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना मोठा फायदा देतात.

महत्वाच्या बातम्या :-
रशियाचा कट्टर समर्थक असलेला ‘हा’ देश उतरला युक्रेनच्या विरोधात; अण्वस्त्रे तैनात केल्यामुळे युक्रेनचं टेन्शन वाढलं
कार चालवायला शिकत असताना ‘कच्चा बदाम’च्या गायकाचा भीषण अपघात, छातीला गंभीर दुखापत, प्रकृती चिंताजनक
प्रेयसीची ‘ही’ मागणी पूर्ण न करू शकल्याने तरुणाने घेतला गळफास, व्हॉट्स ऍप चॅट पाहून पोलिसही हैराण

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now