“शरद पवारांची ही जोरदार मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल”

मुंबई | पारनेरमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक फोडल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

याच संदर्भात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि गृहमंत्री शरद पवार हे मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. तेवढ्यात इकडे संजय राऊत यांनी मोठी घोषणा करून टाकली.

शिवसेनेचे अध्यक्ष आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आज शरद पवार यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊतांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून मुलाखतीदरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच सामनामध्ये ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार असून वृत्तवाहिन्यांवरही ती दाखवण्यात येईल असे ते म्हणाले आहेत.

तसेच शरद पवार चीनपासून ते महाराष्ट्रपर्यंत सर्व घडामोडींबद्दल बोलले असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.