नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने(BJP) 40 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. तसेच भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. तरी देखील भाजपने अद्याप गोव्यात(Goa) नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.(this politician played big role to form government in goa)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “भाजप सत्तेसाठी दावा करत नाही याचा अर्थ भाजपमध्ये अंतर्गत दुही असल्याचे हे लक्षण आहे.” गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 11 जागा मिळाल्या होत्या. गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करत आहोत, असे काँग्रेसने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
गोव्यात भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचे सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत म्हणाले की, “हा जनादेश स्पष्टपणे सत्ताधारी सरकारच्या विरोधात होता. या निवडणुकीत भाजपला 33.31 टक्के मते मिळाली आहेत. यावरून ६६.६९ टक्के मतदारांनी भाजपच्या सत्तेला विरोध केला आहे, हे स्पष्ट होते”, असे कामत म्हणाले.
“भाजप नेतृत्व केवळ वेळ वाया घालवत आहे आणि वारंवार सबबी सांगत आहे”, असे देखील दिगंबर कामत म्हणाले. गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी इतर पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी इतर पक्षांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे देखील कामत यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, “अनेक आमदारांनी काँग्रेसशी संपर्क साधला असून, आम्हाला सरकार स्थापनेत पुढाकार घेण्याचा आग्रह केला आहे. आम्ही सर्व भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांच्या आमदारांना त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करण्याचे आवाहन करतो. गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांच्या आमदारांनी पावले उचलावीत.”
कामत यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने भाजप आमदारांच्या एका गटाने दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप आमदार फळदेसाई म्हणाले की, ‘भाजपला 20 जागा जिंकून जनादेश मिळाला आहे. येत्या चार-पाच दिवसांत आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार आहोत. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी इतकी वाईट आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पायउतार व्हावे लागले आहे.”
महत्वाच्या बातम्या :-
औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? राऊतांचा MIM ला टोला
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
‘त्यावेळी फारूक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं’; ‘द काश्मीर फाईल्स’ वर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया