सध्या भारतात आयपीएलचा धुमाकूळ सुरु आहे. आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पंजाब किंग्स संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांचा पराभव केला आहे. त्यामुळे सध्या पंजाब संघाची सर्वत्र चर्चा होत आहे.(this player is blockbuster in ipl)
पंजाब किंग्समधील फलंदाज आणि गोलंदाज उत्तम कामगिरी करत आहेत. या दरम्यान संघातील एका खेळाडूची सर्वात जास्त चर्चा होत आहे. या खेळाडूचे नाव राहुल चहर असं आहे. राहुलने चेन्नई सुपर किंग्स(CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पंजाब किंग्सला या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.
राहुल चहर यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात होता. पण २०२२ च्या आयपीलच्या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने(MI) राहुल चहरला रिलीज केलं होतं. त्यानंतर लिलावात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये राहुल चहरला विकत घेण्यासाठी जोरदार टक्कर झाली होती. सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघानी देखील राहुलला विकत घेण्यासाठी बोली लावली होती.
मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने राहुल चहरवर ४.५० कोटींची बोली लावली होती. पण पंजाब किंग्स ५.२५ कोटींची बोली लावत राहुल चहरला आपल्या संघात सामील करून घेतले. राहुलला संघात सामील करून पंजाब किंग्सला फायदा झाला आहे. राहुल चहरने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी करत २५ धावा देत ३ विकेट घेतल्या आहेत.
तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात देखील त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात राहुल चहरने महेंद्रसिंग धोनीची विकेट घेतली आहे. राहुलची लेग स्पिन आणि गुगली खेळणे फलंदाजांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे राहुल चहर हा पंजाब किंग्ससाठी महत्वाचा खेळाडू बनला आहे.
मुंबई इंडियन्सला मागील दोन्हीही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे चाहते संघावर टीका करत आहेत. आता मुंबई इंडियन्सला कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्धचा तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना बुधवारी होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यरचे मोठे आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary : देबिना-गुरमीत झाले आई-बाबा; अभिनेत्याने शेअर केला लाडक्या मुलीचा पहिला व्हिडिओ
बाळाचा लंगोट बदलण्यापासून ते माझ्या.., उर्मिला निंबाळकरची पतीबाबतची ‘ती’ पोस्ट चर्चेत
गांजाच्या व्यसनामुळे संतापलेल्या आईने मुलाला खांबाला बांधून केलं ‘हे’ भयानक कृत्य