ऑक्टोबर महिन्यात टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय संघासाठी हा वर्ल्ड कप फार महत्वाचा असणार आहे. या अनुषंगाने आतापासून भारतीय खेळाडूंची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी एका खेळाडूबद्दल महत्वाचे विधान केले आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी एक खेळाडू ‘ऑटोमॅटिक पिक’ ठरू शकेल, असं वक्तव्य सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केलं आहे.(this player first select for indian team for world cup sunil gavskar)
एका मुलाखतीदरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत सुनील गावसकर म्हणाले की, “हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही, तो किती षटके टाकणार, याची केवळ गुजरात टायटन्सच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगताला प्रतीक्षा आहे. जर हार्दिक पंड्याने त्याच्या फलंदाजीसारखीच उत्तम गोलंदाजी सुरू केली आणि कोणतीही चूक केली नाही, तर तो टी-20 विश्वचषकासाठी ऑटोमॅटिक पिक होईल.”
आयपीलच्या २०२२ च्या हंगामात हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिकने १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. यामुळे प्रभावित झालेल्या माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी हार्दिक पंड्याबाबत हे वक्तव्य केलं आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने उत्तम फलंदाजी देखील केली आहे.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ बाद १५८ धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्स संघाने १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल खाते न उघडताच बाद झाला. त्याला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने बाद केले.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विजय शंकर देखील लगेच बाद झाला. विजयने सहा चेंडूंत चार धावा केल्या. १५ धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने मॅथ्यू वेडसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. २८ चेंडूत ३३ धावा करून हार्दिक देखील बाद झाला.
या सामन्यात हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे दोघे भाऊ आमने-सामने आले होते. हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आहे. तर कृणाल पंड्या हा लखनऊ सुपर जायंट्स संघातील महत्वाचा खेळाडू आहे. या सामन्यातील एका षटकात कृणाल पंड्याने हार्दिकला गोलंदाजी केली आणि त्याची विकेट देखील घेतली.
महत्वाच्या बातम्या :-
रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, ‘हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी’
मिलिंद गवळी यांना अभिनयात यश मिळावं, यासाठी त्यांच्या सासूबाई करायच्या ‘हे’ काम; अभिनेत्याने सांगितला किस्सा
कॅनडामध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा डंका; आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावत उंचावली भारताची मान