आत्महत्येनंतर सुशांतच्या बेडरूममध्ये ‘ही’ व्यक्ती सर्वात आधी गेली; सुशांतच्या नोकराचा खुलासा

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येला दोन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याने १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

तसेच सुशांतच्या या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला आहे. सुशांतच्या या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे.

आता सुशांतचा हाऊस हेल्प नीरज याने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरजने वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती त्यावेळी तो बोलत होता.

नीरजला सुशांतच्या आत्महत्येनंतर खोलीत गेलेल्या पहिल्या व्यक्तीबद्दल विचारले असता, त्याने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीचे नाव घेतले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतची खोली उघडण्यात आली. तेव्हा सर्वात आधी सिद्धार्थ पिठाणी आत गेला होता. सुशांत सरांना त्या अवस्थेत पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.

मी दारातच उभं होतो, त्यांनतर सिद्धार्थला कोणाचा तरी फोन आला आणि बॉडी खाली उतरून घ्या, कदाचित श्वास सुरू असेल तर दवाखान्यात घेऊन जाता येईल असे सांगण्यात आले. यानंतर सिद्धार्थने सुशांत सरांचा मृतदेह खाली उतरवला होता, असे नीरजने म्हटले आहे.

दरम्यान, नीरजला रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या भांडणावर प्रश्न विचारले असता, त्याने रिया आणि सुशांत त्याच्या समोर कधीही भांडत नव्हते.

तसेच ज्या दिवशी रियाने घर सोडले तेव्हा मला तिने कपडे पॅक करण्यास सांगितले. यानंतर कपडे पॅक होताच रिया सुशांतच्या घरातून निघून गेली, असेही नीरजने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.