काकांच्या शेवटच्या क्षणांमध्ये डिंपल कपाडियाने नाही तर ‘या’ व्यक्तिने दिली होती त्यांची साथ

बॉलीवूडचे सर्वात मोठे सुपरस्टार म्हणून राजेश खन्नाला ओळखले जाते. त्यांनी ६० आणि ७० च्या दशकामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य केले आहे. बॉलीवूडचे पहीले सुपरस्टार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. त्यांचे आजही करोडो चाहते आहेत.

काका त्यांच्या फिल्मी करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील अनेक वेळा चर्चेत असायचे. लाखो मुली कांकाच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या. त्यांची फिमेल फॅन फॉलोविंग सर्वाधिक होती. आजही इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही अभिनेत्याला काकांसारखे स्टारडम मिळाले नाही.

लाखो मुलींची झोप राजेश खन्नाने उडवली होती. पण राजेश खन्नाची झोप मात्र एकाच व्यक्तिने उडवली होती. राजेश खन्नाच्या सर्वात जवळील व्यक्तिंमध्ये त्यांचे नाव येते. त्या अभिनेत्रीचे नाव आहे अंजू महेन्द्रू. अंजू मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री आहेत.

अंजूने १३ वर्षापासूनच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्यामूळे मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये त्यांचे नाव खुप प्रसिद्ध होते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अंजूला चित्रपटाची ऑफर दिली आणि अंजूने ती ऑफर स्वीकारली. १९६६ मध्ये ‘हर कहानी’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. तर दुसरीकडे काकांनी देखील अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

बॉलीवूडच्या एका पार्टीमध्ये काका आणि अंजूची पहीली भेट झाली होती. अंजू खुप मॉर्डन विचारांच्या होत्या. त्यांच्यासोबत राहणे काकांना देखील आवडत होते. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. त्याकाळी लिव्ह इनमध्ये राहणे ही खुप मोठी गोष्ट होती. पण त्यांनी कोणाचाही विचार न करता लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली.

राजेश खन्ना त्यांच्या करिअरमध्ये खुप चांगले काम करत होते. त्यांचे चित्रपट सुपरहिट होत होते. त्यांना खुप जास्त स्टारडम मिळत होते. तर दुसरीकडे अँजूला चित्रपटांमध्ये फक्त साईड रोल मिळत होते. त्यांना मुख्य अभिनेत्री म्हणून काम मिळत नव्हते. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

अंजू एकमेव अशा व्यक्ति आहेत ज्यांनी काकांचे स्टारडम खुप जवळून पाहीले होते. काकांचे एक साथ १५ चित्रपट सुपरहिट झाले होते. त्यांचे हे यश अंजूने खुप जवळून पाहीले होते. जसे जसे काकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळाले. तसे तसे अंजू आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत होता.

कारण काका सुपरस्टार झाले होते. तर दुसरीकडे अंजू त्यांच्या करिअरमध्ये काहीही करु शकत नव्हत्या. या कारणामूळे दोघांच्या नात्यात ताण निर्माण होत होता. कांकाच्या यशासोबत त्यांच्या स्वभावात देखील अनेक बदल होत होते. त्यांना अंजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण होत होती. दोघांमध्ये भांडण वाढत गेले.

अंजूचे नाव क्रिकेटर गॅरी सोबर्ससोबत जोडले गेले. त्यामूळे दोघांमध्ये अजून भांडण वाढत होते. राजेश खन्नाने अंजूसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी करिअर आणि मॉडेलिंग सोडून लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. पण ही गोष्ट अंजूला मान्य नव्हती. त्यामूळे त्यांनी लग्नाला नकार दिला. १९७२ मध्ये दोघे वेगळे झाले.

१९७३ मध्ये राजेश खन्नाने अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत लग्न केले. असे बोलले जाते की, अंजूला त्रास देण्यासाठी त्यांनी त्यांच्या लग्नाची वरात अंजूच्या घरासमोरुन नेली होती. त्या घरामध्ये काका आणि अंजूच्या अनेक आठवणी आहेत. ही त्याकाळी खुप मोठी बातमी झाली होती.

लग्नानंतर दोघांचा संपर्क बंद झाला. काकांना दोन मुली झाल्या. तर अंजूचा त्यांच्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. १८ वर्ष दोघे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. एवढ्या वर्षांनी दोघे परत एकदा संपर्कात आले आणि त्यांच्या मैत्रीची परत एकदा नव्याने सुरुवात झाली.

राजेश खन्नांची तब्येत खराब होत होती. त्यावेळी अंजू आणि काका परत एकदा एकत्र राहू लागले. त्यांनी आठरा वर्षांनंतर लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. राजेश खन्नाचे आरोग्य खराब झाले. त्यावेळी अंजू आणि डिंपल कपाडिया दोघेही त्यांच्यासोबत होत्या. त्यांची सेवा करत होत्या.

राजेश खन्ना यांचा मृत्यू झाला. त्यावेळी अंजू त्यांच्यासोबत होत्या. २०१२ मध्ये काका हे जग सोडून गेले. त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्या कूटूंबासोबत अंजू देखील त्यांच्यासोबत होत्या. म्हणू त्या काकांच्या आयूष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्ति आहेत.

महत्वाच्या बातम्या –

…म्हणून लग्नाआधी मी निकच्या मागे पाठवला होता बॉडीगार्ड, प्रियांकाचा खुलासा

चिरंजीवी सर्जाची पत्नी मेघनाने दाखवली मुलाची पहिली झलक; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

कंगना राणावत म्हणते, ‘कठीण काळात मला वडिलांनीही मदत केली नाही’

आण्णा नाईक परत येणार…!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.