सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना भारतात आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. काल पुण्यातील सीरमने तयार केलेल्या लसींचे वितरण करण्यात आले. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही लस कोणाला मिळणार आणि कोणाला नाही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी राज्यात ५११ केंद्रावर कोरोना लसीकरण करण्यात येणार असून सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
१८ वर्षांपेक्षा लहान आणि ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांना ही लस मिळणार नाही. मात्र अत्यावस्थ रुग्णांना ही लस द्यावी का याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चर्चा सुरू आहे. तर ॲलर्जी असणारे आणि गर्भवती महिलांना देखील ही लस देण्यात येणार नाही अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
तसेच प्राधान्यक्रमाप्रमाणे लसीकरण मोहीम राज्यात राबवली जाणार असून सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे. देशभरातील विविध भागांमध्ये कोरोना लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा भागांमध्ये कोरोनाची लस निर्धारित ठिकाणांच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहेत. प्रत्येक राज्यात, शहरात या लसीचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा जावई एनसीबीच्या रडारवर; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; ‘एवढ्या’ दिवसांसाठी घातली बंदी
‘हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील’