पेनी स्टॉक चांगला परतावा देतात. त्यांचा रेकॉर्ड देखील उत्कृष्ट आहे. असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यामध्ये फक्त केवळ लाख रुपये गुंतवलेल्या लोकांना करोडोंचा फायदा झाला आहे. असाच एक शेअर कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड(kaiser Corporation limited) या कंपनीचा आहे. या शेअरने एका वर्षात गुंतवणूदारांना करोडपती केलं आहे.(this penny stock gives huge profit to investor)
या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 15,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. गेल्या तीन महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 1,900 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका वर्षांपूर्वी म्हणजेच 12 एप्रिल 2021 रोजी या शेअरची किंमत 38 पैसे होती. आज ती वाढून 60.05 रुपये झाली आहे.
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या शेअरने वर्षभरात 15,702.63 टक्के परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. 2022 वर्ष सुरु झाल्यापासून आतापर्यंत या शेअरने 1,956.51 टक्के परतावा दिला आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी या शेअरची किंमत 2.92 रुपये होती. आज या शेअरची किंमत 60.05 रुपये झाली आहे.
एका महिन्यापूर्वी म्हणजेच 7 मार्च 2022 रोजी या शेअरची किंमत 22.95 रुपये होती. आज ती वाढून 60.05 रुपये झाली आहे. या एका महिन्यात या शेअरने 161.66 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 38 पैसे दराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज ती गुंतवणूक 1.58 कोटी रुपये झाली असती.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 38 पैसे दराने 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला 20.56 लाख रुपये मिळाले असते. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला 2.61 लाख रुपये मिळाले असते. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना १९९३ मध्ये मुंबईत झाली होती. सुरवातीला या कंपनीचे नाव कैसर प्रेस लिमिटेड असं होतं. नंतर ते बदलून कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड असं करण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या :-
इंधनदरवाढीमुळे देशामध्ये अराजक माजेल; इंधन दरवाढीवरून भाजपा खासदाराने व्यक्त केली भीती
मनसे विरुद्ध मनसे! मशीदीसमोर हनुमान चालीसा म्हणणारे भोंगे लावण्यास मनसे नेत्यांचा नकार, वाचा नेमकं काय घडलं?
आनंदाची बातमी! अमित-मिताली ठाकरेला पुत्रप्राप्ती; राज ठाकरे झाले आजोबा