देवेंद्र फडणवीसांना जशाच तसे उत्तर द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. अशातच आता याप्रकरणी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते.

आता या आरोपांची चौकशी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज वर्षा येथील बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः माझी चौकशी करा अशी मागणी केली.

याआधीही परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतरही अनिल देशमुख यांनी माझी चौकशी करा अशी भूमिका मांडली होती. गृहमंत्र्यांच्या या भूमिकेनंतरच याप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर जोरदार आरोप करत आहेत. या सर्व घडामोडींचे बुधवारी मंत्रिमंडळ आणि त्यानंतर वर्षावर झालेल्या बैठकीत पडसाद उमटले. शिवसेनेसह राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी यावर संताप व्यक्त केला.

दरम्यान, महाविकास आघाडीची प्रतिमा ठरवून मलिन करण्याचा प्रयत्न सुरु असून फडणवीस यांना आता जशास तसे उत्तर द्यायला हवे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आपल्या सहकार्‍यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी पुढे जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

शेतकऱ्याचा नादच नाय! पारनेरच्या या शेतकऱ्याने तैवान पिंक पेरू शेतीतून केली ४० लाखांची कमाई

…अन् तहसीलदाराने गॅसवर जाळले तब्बल 20 लाख रूपये; कारण वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.