काय म्हणावं या शाॅटला, ही नवी पिढी बिनधास्त; रिषभ तुला तर हॅट्स ऑफ

अहमदाबाद |  भारत विरुद्ध इंग्लंड असा पहिला टी-२० सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात रिषभ पंतने डोळ्याचं पारणं फेडणारा षटकार मारला आहे. रिषभच्या या शानदार फटक्याचं ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने कौतूक केले आहे.

रिषभने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला सामन्यात तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिव्हर्स स्विप षटकार खेचला आहे. तसेच रिषभने त्यापुढच्या चेंडूवर चौकार खेचला. अशाप्रकारे रिषभने २ चेंडूत १० धावा केल्या . त्यानंतर रिषभ पंत २१ धावांवर  बाद झाला आहे.

भारताचा माजी खेळाडू ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगनेही रिषभच्या या फटक्याचे कौतूक केले आहे. “ही नवी पीढी आहे, एकदम निर्भय… रिव्हर्स स्वीप किंवा शॉट याला काय म्हणावं हे सुचत नाही. पण रिषभ पंत तुला हॅट्स ऑफ!” असं युवराज सिंगने ट्विट करत रिषभचे कौतुक केले आहे.

विराट कोहली, के एल राहूल, शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, भूवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल हे खेळाडू टीम इंडियाकडून मैदानात उतरले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने जोफ्रा आर्चरला मारलेला डोळ्याचं पारणं फेडणारा रिव्हर्स स्विपचा षटकार पाहीलात का?
…तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली की, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला”
१ एप्रिलपासून नवी योजना सुरू, एकदा भरलेल्या प्रीमियमवर आयुष्यभरासाठी पेन्शन; जाणून घ्या

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.