राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण(Vidya Chavan) यांची निवड झाल्याची घोषणा केली आहे.(this NCP leader selected as woman state president)
यापूर्वी रुपाली चाकणकर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होत्या. पण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाचे पद रिकामे होते.
आता त्या जागी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. विद्या चव्हाण या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतील महत्वाच्या नेत्या आहेत. त्या माजी आमदार देखील होत्या. महागाईच्या मुद्द्यावरून विद्या चव्हाण यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. राज्यातील विविध मुद्यांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अखिल भारतीय महिला आघाडीच्या अध्यक्षा निवेदिता माने यांनी दिलेली नवीन जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. त्यासाठी मी खूप मेहनत घेईन. यासाठी मला सर्वांचे सहकार्य मिळेल”, असे विद्या चव्हाण यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की, “देशात सध्या महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही याविरोधात आवाज उठवणार आहोत. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिकामं होतं. या पदावर आता माझी निवड झाली आहे”, असे विद्या चव्हाण यांनी सांगितले आहे.
यावेळी विभागनिहाय इतर पदाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची राष्ट्रवादी महिला ठाणे विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘मॅडम ब्लाऊज घालायच्या विसरल्या वाटतं…’; ‘त्या’ बोल्ड फोटोवरून प्राजक्ता माळी तुफान ट्रोल
ज्या मुलासाठी आर. माधवनने देश सोडला, तोच आता म्हणतोय, मला त्यांचा मुलगा म्हणून रहायचं नव्हतं..
कंगनाने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; पहा व्हायरल व्हिडिओ