पिंपरी-चिंचवडमधील ‘ह्या’ माणसाने घातलाय सोन्याचा मास्क

पिंपरी | कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जसे की, बाहेर जाताना मास्क वापरा. सॅनिटाइझरचा वापर करा. तसेच मास्क वापरला नाही तर पोलिसांकडून दंड आकारण्यात येत आहे.

आता सध्याला बाजारात कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये एका माणसाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी आणि गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे शंकर कुऱ्हाडे हे सोन्याचा मास्क घालून शहरभर फिरत आहेत. हा सोन्याचा मास्क पाहून अनेकांच्या नजरा आपोआप त्यांच्याकडे फिरतात.

दरम्यान, याआधी एका सोनाराने चांदीचा मास्क बनवल्याचे वृत्त आले होते. सोनार ऑर्डरनुसार चांदीचा मास्क बनवून देत होता. मग काय यावरून शंकर कुऱ्हाडे यांना सोन्याचा मास्क बनवून घेण्याची युक्ती सुचली.

मग त्यांनी तब्बल २ लाख ९० हजार रुपयांचा पावणेदोन तोळ्याचा मास्क बनवून घेतला. गळ्यात सोन्याचा गोफ, हाताच्या सर्व बोटात सोन्याच्या अंगठ्या, मनगटात सोन्याचे कडे आणि आता तोंडावर सोन्याचा मास्क यामुळे रस्त्याने जाताना सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे जाते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.