मानलं रे पठ्ठ्या! पुरंदरच्या या धुरंदराने केला शरद पवारांचा डाव उघडा

पुरंदर तालुक्‍यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे सासवड येथे आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी ‘पुरंदरचे प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा डाव’ असल्याचा आरोप केला आहे.

“पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणं हे मोठं षडयंत्र आहे. विमानतळाची आधीची पारगाव आणि सात गावांची जागा बदलून नव्यानं रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावातील म्हणजे पुरंदर तालुक्यातील जागा घ्यायची आणि विमानतळाचं प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करुन तिकडचा विकास साधायचा.” असा आरोप शिवतारे यांनी केला आहे.

“मग, विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार आणि सर्वांगिण विकासाची संधी जाणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत,” असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.

पुरंदरचे विमानतळ बारामतीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झाल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन करु असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे. पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.

प्रेयसीच्या पतीने रंगेहाथ पकडताच पोलीसाने अंडरपॅंटवरच गॅलरीतून उडी मारली; जागीच ठार

मुंबईची लेडी सिंघम! १४ व्या वर्षी केले लग्न १८ व्या वर्षी बनली आई अन् अशी झाली आयपीएस

‘जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील’; शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.