आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगबद्दल बरीच चर्चा झाली आहे. या खेळाडूने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येकाच्या जिभेवर एकच नाव. ते नाव आहे रिंकू सिंग. ज्याने लखनौविरुद्ध १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४० धावांची तुफानी खेळी केली आणि सामना जवळपास केकेआरच्या बाजूनी वळवला.(Rinku Singh, IPL, Kolkata Knight Riders, Lucknow Super Giants,)
त्यानंतर त्याच्या फलंदाजीचा लोकांना विश्वास बसला आहे. या खेळाडूने खडतर संघर्षानंतर आयपीएलमध्ये ठसा उमटवला आहे. अलिगढमधून आलेल्या रिंकू सिंगची कथा खूपच प्रेरणादायी आहे. जे युवा खेळाडूंमध्ये ऊर्जा भरण्याचे काम करेल. रिंकू सिंगने आयपीएलपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला?
लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार होता. तसेही आयपीएलला असे रोमांचक सामने खेळण्यासाठी ओळखले जाते. असाच एक नजारा आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात पाहायला मिळाला. ज्यात कोलकत्याचा युवा फलंदाज रिंकू सिंगने स्फोटक खेळी करत सर्वांची मने जिंकत होता. त्याने १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या.
रिंकू सिंगने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने केएल राहुलच्या हृदयाचे ठोके वाढवले. ग्राउंडवर केएल राहुल खूपच अस्वस्थ दिसत होता. पण, रिंकूच्या शेवटच्या षटकात एव्हिन लुईसने अप्रतिम झेल टिपून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रिंकू सिंग ज्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत होता. त्यानंतर कोलकाताचा सामना संघ जिंकू शकेल असे वाटत होते.
मात्र रिंकू सिंग बाद झाल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. आणि अखेर लखनौने हा सामना अवघ्या २ धावांनी जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. आयपीएलमध्ये खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. दुसरीकडे केकेआरचा युवा फलंदाज रिंकू सिंगला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
आयपीएलने युवा खेळाडूंना व्यासपीठ दिले. जेणेकरून तो आपली क्षमता जगासमोर ठेवू शकेल. ज्यामध्ये अनेक वेळा युवा खेळाडूही यशस्वी होतात. अलिगडमधून आलेल्या रिंकू सिंगची कहाणी अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देऊ शकते. जे खेळाडू क्रीडाविश्वात आपले करिअर करण्याचा विचार करत आहेत.
आम्ही तुम्हाला रिंकू सिंगबद्दल सांगतो. त्याच्या कुटुंबात एकूण ५ बहिणी आणि भाऊ आहेत. एक भाऊ ऑटो रिक्षा चालवतो, तर दुसरा कोचिंग सेंटरमध्ये काम करतो. रिंकूला अभ्यासात फारसा रस नव्हता. त्यामुळे तो ९वीत नापास झाला. लहानपणापासूनच त्याचे लक्ष क्रिकेटकडे होते. यासाठी त्याला घरच्यांकडून अनेकदा मारहाणही करावी लागली.
पण, त्याने हार मानली नाही आणि क्रिकेटर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरला. या तरुण खेळाडूने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता की, २०१२ मध्ये क्रिकेट खेळल्यामुळे त्याला वडिलांकडून मार खावा लागला होता. पण, त्याच वर्षी त्याने क्रिकेट खेळताना मोटारसायकल जिंकली. त्यानंतर वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यापासून रोखले नाही.
कदाचित त्यांनाही कळले असेल की माझा मुलगा एक दिवस मोठा प्लेयर बनू शकतो. रिंकू सिंगने असेही सांगितले की, तो क्रिकेटर होण्यापूर्वी एकदा त्याने आपल्या भावाला जॉबसाठी विचारला होते, तेव्हा त्याने त्याला साफसफाई आणि फरशी पुसायचे काम दिले होते. यानंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
म्हणतात कि, ज्याच्या स्वप्नात जान असते त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. रिंकू सिंगने हे सत्य असल्याचे सिद्ध करून दाखवले. असो, क्रिकेटमध्ये स्थान मिळवणे सोपे नाही. पण, खेळाडूने कधीही हार मानू नये. रिंकू सिंगची एंट्री आयपीएल २०१७ मध्ये झाली.
ज्याला आयपीएल लिलावात पंजाब किंग्सने पहिल्यांदा १० लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र त्यावर्षी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर २०१८ मध्ये KKR ने या खेळाडूवर ८० लाख रुपये खर्च केले. रिंकू २०१८ पासून केकेआरचा भाग आहे आणि संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईतील हॉटेलमधील घटनेने खळबळ, संभोग करताना ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु, कारण अस्पष्ट
मोठी बातमी! मुंबई संघातून अर्जुन तेंडूलकर बाहेर, ‘या’ क्रिकेटरच्या भावाला संघात मिळाली जागा
केतकी चितळे आता पुरती अडकली; न्यायालयाच्या कठोर आदेशाने पाय आणखी खोलात
पोलिस अधिकारी हेमंत करकरेंच्या मृत्यूला उद्धव ठाकरेंच्या जवळचा ‘हा’ शिवसेना नेता जबाबदार