‘या’ कारणामुळे झाला होता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानचा घटस्फोट

 

अभिनेते आणि अभिनेत्रींची ओळख चित्रपटाच्या सेटवर होते. शुटिंगच्या वेळेसच अनेकांच्या लव्ह स्टोरी सुरू होतात आणि ते लग्न करतात. अशीच एक जोडी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आहे.

या जोडीची प्रेमकहाणी शुटिंग सुरू असताना झाली आणि शेवटही शुटिंगच्या सेटवरच झाला. ही जोडी आहे मराठी टेलिव्हिजनवरची सर्वात हिट जोडी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि शशांक केतकरची.

तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर हे दोघेही टेलिव्हिजनवरचे प्रसिद्ध कलाकार आहेत. त्या दोघांनी ‘होणार सुन मी ह्या घरची’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. या मालिकेच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

होणार सुन मी ह्या घरची ही मालिका टेलिव्हिजनवरच्या सर्वात हिट मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने प्रसिद्धीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. मालिकेसोबतच तेजश्री आणि शशांक या दोघांची जोडी देखील प्रचंड हिट झाली होती. त्यामूळे या दोघांची लव्ह स्टोरी जास्त दिवस लोकांपासून लपवून राहिली नाही.

२०१४ मध्ये या दोघांनी मीडियासमोर आपल्या नात्याचा स्वीकार केला. दोघांनी सांगितले की, आम्ही दोघे एकमेकांवर खुप जास्त प्रेम करतो आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत.’ सांगितल्याप्रमाणेच दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले.

टेलिव्हिजनवरची सर्वात हिट जोडी खऱ्या आयुष्यात देखील हिट झाली होती. तेजश्री आणि शशांकने लग्न केले होते आणि ते दोघेही त्यांच्या संसारात खुप आनंदी होते. पण या दोघांचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही.

लग्नाच्या काही दिवसांनंतरचं या दोघांच्या भांडणाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. शेवटी ही गोष्ट खरी ठरली. दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर दोघांच्या नात्यामध्ये खुप मोठी दरी आली.

शशांक केतकरने घटस्फोटाच्या अर्जात लिहिले होते की, तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते. त्यासोबतच ती मला वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून वाईट वागणूक देते.
असा मानसिक छळ करणे वारंवार सुरू होत असल्याचे त्याने सांगितले.’

या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे भांडण सुरू असताना त्यांच्या कुटुंबाने आणि मित्र परिवाराने त्यांना समजवण्याचा खुप प्रयत्न केला. पण त्या दोघांची भांडण कमी होत नव्हते.

त्या दोघांमधील वाद मोठ्या प्रमाणावर वाढले होते. ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते. त्यामूळे मालिकेच्या निर्मात्यांना ही मालिका लवकरच संपवावी लागली होती. घटस्फोटानंतर या दोघांनी परत कधीच एकत्र काम केले नाही.

२०१७ मध्ये शशांक केतकरने त्याची फेसबुक मैत्रीण प्रियांका हिच्याशी लग्न केले. पण तेजश्रीने मात्र अजून दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. ती तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे. या दोघांची लव्ह स्टोरी मालिकेच्या सेटवरुन सुरू झाली आणि मालिकेसोबतच या दोघांची लव्ह स्टोरी संपली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.