सरोज खान यांनी इंस्टाग्रामवर केली होती ‘ही’ शेवटची पोस्ट

मुंबई | चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे मुंबईमध्ये निधन झाले. सरोज खान या ७१ वर्षांच्या होत्या. सरोज खान काही दिवसांपासून आजारी होत्या.

श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे त्यांना बांद्रा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा तब्येत जास्त बिघडल्यामुळे पहाटे २ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

कोरियोग्राफर सरोज खान यांनी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्हत्येबद्दल सोशल मिडियावर शेवटची पोस्ट केली होती. सुशांतच्या निधनाबद्दल सरोज खान यांनी शोक व्यक्त केला होता.

त्यांच्या त्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सरोज खान यांनी एका कॅप्शन सोबत सुशांतचा फोटो शेयर केला होता.

सरोज खान यांनी इंस्टाग्रामवर लिहिले होते कि, मी कधीही सुशांत सोबत काम केले नाही. पण आम्ही अनेक वेळा भेटलो होतो. मी हैराण झाले कि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इतके कठोर पाऊल उचलले.

पुढे त्यांनी असेही लिहिले की, मला कल्पनाही करवत नाही की सुशांतच्या या पावलामुळे त्याच्या वडिलांवर आणि बहिणीवर काय परिणाम झाला असेल. तसेच त्यांनी पुढे असेही लिहिले, देव सुशांतच्या आत्म्याला शांती देवो.

पुढे सरोज खान म्हणाल्या कि, ज्याकाही चित्रपटांमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली. त्या त्याच्या सर्व चित्रपटांवर प्रेम करत होत्या. त्या नेहमी सुशांतवर प्रेम करत राहतील, तुम्ही नेहमी आमच्या हृदयामध्ये राहाल.

मात्र आता सरोज खान यांच्या जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सरोज यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.