याला म्हणतात संस्कार! रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली बाप्पाची आरती; व्हिडिओ व्हायरल

मुंबई। बॉलीवूड मधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख व त्याच संपूर्ण कुटुंब कायम चर्चेचा विषय ठरलं आहे. बऱ्याचदा रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया तर कधी त्याच्या मुलांची सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. काल (शुक्रवारी) संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा करण्यात आला.

प्रत्येकाच्या घरोघरी काल गणपतीचे आगमन झाले असून बाप्पा घरी आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र आजूबाजूला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच रितेश देशमुखने देखील आपल्या घरी बाप्पाचं आगमन केल आहे.

मात्र यावेळी सर्वत्र चर्चा रितेश किंवा जेनेलियाची नसून या दोघांच्या मुलांची आहे. रितेशने नुकताच चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याची दोन्ही मुलं आरती म्हणताना दिसत आहेत.

रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलिया यांची दोन्ही मुलं रियान आणि राहील बाप्पाची आरती म्हणताना दिसत आहेत. त्या दोघांनीही खूप सुंदर असे कुरते परिधान केले आहेत. हात जोडून दोघंही बाप्पाची आरती म्हणत आहेत.

रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मुलांचं कौतुक केलं आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच यामध्ये रितेशची मुले खूप स्पष्टपणे गणपतीची आरती म्हणत असल्याचे पाहून सोशल मिडीयावर नेटकरी देखील त्यांचे कौतुक करत आहे.

जरी सोशल मीडियावर मुलांचं कौतुक होत असलं तरी मुलांसोबतच नेटकऱ्यांनी रितेशचं देखील कौतुक केलं आहे. आपली परंपरा, वारसा आपल्या मुलांना शिकवणं हे प्रत्येक आई- बापाचं कर्तव्य असतं, व हे कर्तव्य रितेश जेनेलियाने चोख पार पाडल्याचे या व्हिडिओवरून समजत आहे.
महत्वाच्या बातम्या
आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ ढसाढसा रडल्या 
“आज माझे आणखी एक स्वप्न पुर्ण झाले, आईवडीलांना विमानात बसवले”; नीजर चोप्राची भावूक पोस्ट
बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल.. 
तालिबान्यांचं राक्षसी कृत्य! माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या भावाची केली निर्घृण हत्या; आधी गळा कापला, मग घातल्या गोळ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.