Share

‘या’ IPS ने संजय दत्तला सगळ्यांसमोर चोपला होता; वाचा त्यांनी स्वत:च सांगीतलेला थरारक किस्सा

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt) हा त्याच्या अभिनयापेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला होता. त्याचे अफेअर्स, डी-कंपनीसोबत संबंध आणि त्याची जेलवारी या अनेक गोष्टींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (This IPS officer slapped sanjay dutt)

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘संजू’ या चित्रपटात याबाबतच्या अनेक घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात माजी पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी संजय दत्तला अटक केली होती, तो प्रसंग देखील दाखवण्यात आला आहे. माजी पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिले आहे की, “काही दिवसांपासून मी तणावात होतो. मी संजय दत्तचे खोटं बोलणं सहन करू शकलो नाही. त्यामुळे मी त्याला कानाखाली वाजवली. संजय दत्त खाली पडणार इतक्यात मी त्याची मान पकडली. त्यावेळी तो खूप घाबरला होता. त्याच्याकडे बघत मी त्याला म्हणालो की मी तुला एका चांगल्या व्यक्तीप्रमाणे विचारतोय. तू पण मला त्याप्रमाणे उत्तर दे.”

राकेश मारिया यांनी या पुस्तकात अनेक खुलासे केले आहेत. संजय दत्तला तुरुंगामध्ये भेटायला त्याचे वडील सुनील दत्त, दिग्दर्शक महेश भट्ट आणि यश जोहर यायचे, असे राकेश मारिया यांनी पुस्तकात सांगितले आहे. संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्यासमोर आपली चूक कबुल केली होती. तसेच शस्त्रे नष्ट केल्याचे देखील संजय दत्तने वडील सुनील दत्त यांना सांगितले होते, असे राकेश मारिया यांनी पुस्तकात सांगितले आहे.

संजय दत्तने वडिल सुनील दत्त यांना सांगितल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. सुनील दत्त यामुळे खूप संतापले होते. संजय दत्त तुरुंगात अनेकवेळा कुटुंबियांना भेटण्याची इच्छा व्यक्त करायचा. संजय दत्त त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप बोलायचा आणि रडायचा, असे राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिले आहे.

१९९३ मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर राकेश मारिया यांची डीसीपी पदी नियुक्ती करण्यात आली होती. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी राकेश मारिया हे मुंबई पोलीस आयुक्तपदी होते. राकेश मारिया यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्कावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“..त्यावेळी मी संजय दत्तच्या झिंज्या उपटल्या आणि खाड खाड कानाखाली वाजवल्या”
भर बैठकीतच भरणे अन् राऊतांमध्ये जुंपली; आधी खाली बसा म्हणत राष्ट्रवादीच्या भरणेंनी राऊतांना झापले
दिपिका पदूकोनची तब्येत बिघडली; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे तातडीने हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल

ताज्या बातम्या इतर बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now