लंडन | ४३ वर्षाचे दीपक पालिवाल ब्रिटनमध्ये फार्मा कन्सल्टंट आहेत. त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोना लसीच्या प्रयोगासाठी वॉलंटियर म्हणून काम करत आहे.
हे पण खरं आहे की, प्रयोगासाठी स्वतःला निवडणे हे खूप धोकादायक आहे. पण दीपक यांनी निश्चय केला आहे की, ते मागे हटणार नाहीत. ते कोरोना लसीच्या ट्रायलसाठी आपला जीव धोक्यात घालायला तयार आहेत.
त्यांनी सांगितले की, मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा माझा परिवार म्हणजे माझी बायको आणि मुले खूप चिंतेत होते. ते माझ्या या निर्णयाच्या पूर्ण विरोधात होते. पण या कोरोनाला जगातून घालवण्यासाठी माझं काहीतरी योगदान असावं म्हणून मी हा निर्णय घेतला.
त्यासाठी मला माझा जीव धोक्यात घालायची वेळ आली तरी चालेल पण मी तयार आहे, असं दीपक म्हणाले आहेत. एप्रिल १६ तारखेला पालिवाल वॉलंटियर बनले. १००० वॉलंटियर्समध्ये त्यांचाही समावेश आहे.
आधी त्यांची पत्नी त्यांच्या या निर्णयाला तयार नव्हती पण आता त्यांना दीपक यांच्या या निर्णयावर अभिमान आहे. मूळचे जयपूरचे असणारे पालिवाल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला पहिल्यांदा भीती वाटत होती.
कारण ही लस पहिल्यांदा फक्त प्राण्यांवर टेस्ट करण्यात आली होती. काही जण मला म्हणाले की, याचा प्रभाव तुमच्या शरीरावर पडू शकतो. मग तो वाईटही असू शकतो आणि चांगलाही असू शकतो. पन मला आता कसलीही भीती नाहीये.