विदर्भात शुटींगला आल्यानंतर महीलेशी गैरवर्तन करणाऱ्या मोठ्या बाॅलीवूड अभिनेत्याला बेड्या

मुंबई | बॉलीवूडमध्ये बऱ्याच कलाकारांवर आरोप प्रत्यारोप झाले. सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आणि खुलसेही झाले.

तसेच काही दिवसांपूर्वी मी टू मूव्हमेंटमुळे अनेक अभिनेत्रींनी बॉलीवूडच्या बड्या कलाकारांवर, दिग्दर्शकांवर शोषणाचे आणि विनयभंगाचे आरोप केले. सध्या अजून एक अभिनेता विनयभंगाच्या आरोपाखाली अडकला आहे.

शेरणी चित्रपटाचं शूटिंग मध्य प्रदेशमध्ये बालघाट जिल्ह्यात सुरू आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम विदर्भात आली आहे. सध्या सगळी टीम गोंदिया शहरातील गेट वे या हॉटेलमध्ये थांबली आहे. तिथे सगळ्या कलाकारांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

याचदरम्यान या चित्रपटाच्या स्टाफमधील एका महिलेने विजयराज यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. पीडित महिलेने त्यांच्याविरोधात गोंदियामधील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद झाल्यावर विजयराज यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात नेण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना न्यायालयात नेण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि पूर्ण जिल्ह्यात आणि शहरात याबद्दल चर्चा सुरू होती..याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.