अली गोनी आणि जास्मिन भसीन हे टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. पण आता या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नुकतंच अली गोनीने(Ali Goni) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्यांचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.(this famous couple breakup and shear photo on social media)
अभिनेता अली गोनीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अली गोनीने लिहिले आहे की, “एकत्र नाहीत, परंतु आमचं मन नेहमीच एकमेकांशी जोडलेले असेल. ” या फोटोमुळे अली गोनी आणि जास्मिन भसीन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
— Aly Goni (@AlyGoni) April 4, 2022
या फोटोमध्ये अली गोनी जस्मिनला मिठी मारताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना अली गोनीने कॅप्शनमध्ये इन्फिनिटीचे चिन्ह देखील टाकले आहे. अभिनेत्री जास्मिन भसीननेही तीच पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे. तसेच ती पोस्ट अली गोनीला टॅग देखील केली आहे. या पोस्टवरून दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने कमेंट करत म्हंटले आहे की, “का काय झाले??? तुम्ही काही हिंट देत आहात का?? तुम्हाला असे म्हणायचे आहे की आम्ही यापुढे एकत्र नाही?” तर दुसऱ्या एका युझरने कमेंट करत म्हंटले आहे की, “तुमचं ब्रेकअप झालं असं म्हणू नका. मी खरोखर मरेन”
अभिनेता अली गोनीने ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेला फोटो बिग बॉसच्या घरातील आहे. बिग बॉसच्या घरात दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. शो संपल्यानंतर देखील कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसायचे. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांचे फोटो शेअर करायचे. पण आता दोघेही वेगळे झाले आहेत, असे सांगितले जात आहे.
ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा देखील ब्रेकअप झाला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या पांडे आणि ईशान खट्टर ३ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आहे. ‘खाली पीली’च्या सेटवर दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग सुरू झाली आणि त्यातून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. मात्र, ३ वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेर त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा झाली?
येडे चाळे! मगरीच्या पाठीवर बसून केला डान्स, पुढं घडलं असं काही की.., पहा थरारक व्हिडीओ
रणबीर-आलियाच्या लग्नात सहभागी होणार ‘हे’ सेलिब्रिटी; पाहुण्यांची यादी आली समोर