महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक कलाकार अजून देखील मुंबईतील(Mumbai) एका चाळीत राहत आहे. (this famous actor still stays in chawl)
नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकार निखिल बने याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. निखिल बने याने आपल्या घराचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये निखिल बने याने चाळीतील आपले संपूर्ण घर दाखवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकार निखिल बने मुंबईतील भांडुप भागातील एका चाळीत राहतो.
नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार निखिल बने याने आपल्या घराची दुरुस्ती केली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून निखिल बने याने आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये निखिल बने याने लिहिले आहे की, “जुन्या जागेत एक आत्मा असतो. त्यामुळे ती जागा सोडण्यापेक्षा renovate करण्यात खरी मजा असते.”
यासंदर्भात बोलताना निखिल बने म्हणाला की, “घर renovate करताना शेजारच्या लोकांनी खूप मदत केली. चाळीमध्ये एकत्र राहायला खूप मजा येते. तुमच्या सुखात, दुःखात सर्वजण तुमच्या मदतीला धावून येतात”, असे महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार निखिल बने याने सांगितले. निखिल बने या कलाकाराला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे ओळख मिळाली.
निखिल बने महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. सध्या निखिल बने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात लहान भूमिका करतो. तसेच निखिल बने या कार्यक्रमात बॅकस्टेजचे देखील काम सांभाळतो. निखिल बने सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे.
तो नेहमीच सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. तसेच फोटो देखील शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक देखील केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
कोण होते मोहम्मद पैगंबर ज्यांच्यामुळे पुर्ण जगात पेटला आहे वाद? वाचा त्यांच्या खास गोष्टी
घरात झुरळं पाळण्यासाठी ही कंपनी देत आहे १.५ लाख रुपये, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
तुम्हाला माहित आहे का शक्ती कपूर यांचे खरे नाव? वाचा त्यांच्या नावामागील भन्नाट कथा