पेट्रोलपंपावर हवा भरण्यासह ‘या’ सुविधा मिळतात मोफत; कुणी देत नसेल तर ‘अशी’ करा तक्रार

आजकाल दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर डिझेल आणि पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे तर कंबरडेच मोडले आहे. वाहनात इंधन भरण्यासाठी आपले वाहन घेऊन पंपावर जावे लागते. आपन पंपावर जातो आणि फक्त डिझेल किंवा पेट्रोल भरून निघून जातो.

आपन कधी विचार केला आहे का की आपल्यासाठी पेट्रोलपंपावर काही सूविधा आहेत ज्या आपल्याला देणं पेट्रोलमालकांना बंधनकारक आहेत. भारतात अनेक तेल कंपन्या आहेत ज्या आपल्याला डिझेल पेट्रोल पुरवत असतात. त्यांनी एक यादी प्रसिध्द केली आहे. या यादीमध्ये त्यांनी पंपमालकांनी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली आहे.

शौचालय आणि स्वच्छतागृह

पंपावर शौचालय आणि स्वच्छतागृह असणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर वेळोवेळी स्वच्छ केलेले असणे जरूरी आहे. जर शौचालयात स्वच्छता नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता.

स्वच्छ पाणी

पंपावर स्वच्छ पाणी असणे जरूरी आहे. तुम्ही बाटलीमध्ये सुद्धा पाणी भरून घेऊन जाऊ शकता.

प्रथमोपचार पेटी

प्रवासात तुम्हाला गरज पडल्यास पंपात प्रथमोपचार पेटी असावी. यात प्रथमोपचाराची साधने चांगल्या दर्जाची असावीत.

हवा भरण्याची सुविधा

ही सुविधा पंपावर मोफत मिळते. ज्यावेळेस पंपावर तुम्ही जाता तेव्हा आपल्या वाहनात मोफत हवा भरून मिळू शकते. त्यासाठी पंपमालकांनी हवा भरण्यासाठी मशीन उपलब्ध केली पाहिजे.

पंपाची वेळ

ग्राहकांना दिसेल अशा ठिकानी पेट्रोलपंप उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ लिहलेला एक बोर्ड असला पाहिजे.

तक्रार नोंदवण्यासाठी पुस्तिका

पंपातील कर्मचाऱ्यांबाबत, सुविधांबाबत काही तक्रार करायची असेल तर त्यासाठी एक वही ठेवलेली असावी. त्यामध्ये तुम्ही तक्रार नोंद करून ठेवू शकता.

आपत्कालीन फोन नंबर

पंपावर पोलिस, रूग्णवाहिका, अग्निशामक, यांचे फोन नंबर असणे जरूरी आहे. तुम्ही प्रवासात गरज लागली तर हे नंबर वापरू शकता.

बिलाची सुविधा

पेट्रोल डिझेल भरल्यानंतर तुम्ही हक्काने त्याचं बील मागू शकता. ही सुविधा तर पंपात असलीच पाहिजे. जर तुम्ही बील घेत नसाल तर चूक करत आहात. याचा फायदा पंप मालकांना होत असतो.

पंपाचा मालक, अधिकाऱ्याची नावे व फोन नंबर

पंपावर पंपाच्या मालकाचे नाव, पंपाच्या व्यवस्थापकाचे नाव, अधिकाऱ्यांची नावे, पंपाच्या कंपनीचे नाव व फोन नंबर लिहलेले असावे. जेणेकरून सर्वसामान्य नागरीक वेळप्रसंगी संपर्क करू शकतील

या सोयीसुविधा मिळत नसतील तर तक्रार कोठे करावी

वरीलपैकी सुविधा मिळत नसतील. आणि मिळत जरी असल्यातरी तुमच्याकडून पैसे मागितले जात असतील तर पंपमालकाविरोधात तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला Pgportal.gov या संकेतस्थळावर तक्रार करू शकता. तसेच पंप ज्या कंपनीचा असेल त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन संपर्क क्रमांकावर आणि ईमेलवर तक्रार करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या-
बातमी कामाची! राज्यात नोकरभरतीला सुरुवात; पाहा कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आनंद महिंद्रांकडून ‘या’ सहा खेळाडूंना मिळणार कार गिफ्ट
ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी संजिवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्वीट करत भारताचे मानले आभार
प्रेमभंगात भाईचा दिलजले झाला! खचून न जाता सुरू केला दिल टूटा आशिक कॅफे; आता नुसता राडा सुरूय

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.