चीनला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी ‘या’ देशाने सुरू केली लढाईची तयारी

मुंबई | सध्या भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-चीन युद्घामध्ये भारताचे वीस जवान शहीद झाले आहेत.

या युध्दाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी चीनला मोठा झटका दिला आहे. भारताने चीनचे तब्बल ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. भारतानंतर आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनवर दबाव वाढवण्यासाठी नवीन घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणुबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. या मागणीमुळे चीन-ऑस्ट्रेलियाचे संबंध ताणले गेले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया पुढील दहा वर्षात आपले संरक्षण बजेट ४० टक्क्यांहून अधिक वाढवेल. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी मोठे शस्त्र देखील खरेदी करेल.

त्याचबरोबर येत्या दहा वर्षात ऑस्ट्रेलिया हवाई, समुद्र आणि भूमीवर लांबपर्यंत हल्ला करणारे शस्त्र खरेदी करेल. यासाठी ऑस्ट्रेलिया १८६ अब्ज डॉलर्स खर्च करेल.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान चीनचे नाव न घेता म्हणाले की, आम्हाला हिंद प्रशांत क्षेत्र कोणा एकाच्या वर्चस्वापासून दूर ठेवायचे आहे. आम्हाला हा भाग सर्व देशांना मुक्तपणे व्यापार करता येईल असा ठेवायचा आहे.

दरम्यान चीनने ऑस्ट्रेलियाचे अनेक उत्पादने आयात करण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या दबावाला ऑस्ट्रेलियाने आता तोडीसतोड उत्तर दिले आहे. आर्थिक नुकसानीची अशी भीती आम्हाला कोणीच दाखवू शकत नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.