…हे प्रकरण भविष्यात देशाला सर्वात जास्त घातक ठरणार; शिवसेनेचा केंद्राला गंभीर इशारा

 

मुंबई | देशात भारत-चीन सीमेचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. असे असताना गलवान खोऱ्यातल्या भारत-चीन सैनिकांच्या झटापटीत भारताने आपले काही सैनिकही गमावले आहे.

सैनिकांना गमावल्याने पूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे आता केंद्राने चीन विरोधात कठोर पाऊल उचलत ५९ चिनी अ‍ॅपवर भारतात बंदी आणली आहे.

या निर्णयाबाबत शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रात एक अग्रलेख लिहला आहे, सोबतच शिवसेनेने केंद्राला एक नव्या संकटाचा गंभीर इशाराही दिला आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेला झटका देणे गरजेचे होतेच, पण फक्त अ‍ॅपवर बंदी घालून त्याचे कंबरडे मोडले जाणार नाही. चीनचा हिंदुस्थानातील व्यापार आणि गुंतवणूक हा विषय आहे.

सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातसारख्या राज्यात आहे. हिंदुस्थानात ‘5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई (Huawei) कंपनीला मिळाले आहे.

या कंपनीच्या हाती हिंदुस्थानच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे म्हणजे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे.

हे प्रकरण भविष्यात सर्वात जास्त घातक ठरणार आहे हे काय सरकारला कळू नये?, असे शिवसेनेने मुखपत्रातून म्हटले आहे.

दरम्यान, लडाख संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला जी डिजिटल जाग आली ती जाग कायम राहावी, असा टोलाही केंद्राला मुखपत्रातून लगावण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.