Share

मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! दोन नगरसेवकांसह ‘हा’ मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार

सध्या मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यादरम्यान मनसेला(MNS) मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.(This big leader will enter Shiv Sena with two corporators)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसे पक्षाचे नगरसेवक प्रभाकर जाधव आणि पूजा गजानन पाटील शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या दोन नगरसेवकांसोबत मनसे पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मत विचारात न घेणे. स्थानिक नेतृत्वाकडून पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कारणांमुळे मनसे पक्षातील नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ दिवसांत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले होते. साधारणतः १४ महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषद यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. पण येत्या दोन आठवड्यांमध्ये या निवडणूक घेण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

या निवडणुकांच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले जात आहे. २०१५ मध्ये झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर मनसे पक्षाचे नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मनसेचे आणखी दोन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

या नगरसेवकांसोबत मनसेचे अनेक कार्यकर्ते देखील शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसे पक्षाची मोठी हानी झाली आहे. येत्या काळात कल्याण ग्रामीण भागातील अनेक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
होय आमच्यात मतभेद आहेत, पण…; वसंत मोरेंनी पहिल्यांदाच दिली कबुली; पुढचा मार्गही सांगितला
खूपच ग्लॅमरस अवतारात दिसली सारा तेंडुलकर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पहा फोटो
‘या’ कारणांमुळे राज ठाकरेंच्या नातवाचं नाव आहे खास; जाणून घ्या नाव आणि त्याचा अर्थ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now