‘या’ अभिनेत्रीने काहीच नसणाऱ्या अक्षयकुमारला रातोरात स्टार बनवले होते; पण पुढे..

टिम काथ्याकूट – अक्षय कुमार बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. तो काही अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. पण सध्या तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये फॅमिली मॅन म्हणून ओळखला जातो.

पण एक काळ असा होता जेव्हा दर दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीशी जोडले जायचे. त्याचे अफेअर मीडियामध्ये खुप हायलाईटमध्ये असायचे.

अशा एका अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे पुजा बत्रा. पुजा बत्राने १७ व्या वर्षी मॉडेलिंग सुरु केली होती. १९९३ मध्ये १८ व्या वर्षी पुजाने फेमिना मिस इंडिया इंटरनेशनलचा ( Femina Miss India International) किताब जिंकला होता.

या कालावधीमध्ये अक्षय कुमार आणि पुजा यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हे दोघे एकमेकांना डेट करू लागले.

पुजा त्यावेळची टॉपची मॉडेल होती. त्यामूळे पुजाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख होती. तिला इंडस्ट्रीतील अनेक पार्टींमध्ये बोलावले जायचे.

पार्टींमध्ये जाताना पुजाने अक्षय कुमारला सोबत घेऊन जायला सुरुवात केली. कारण त्यावेळी अक्षय फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्ट्रगल करत होता.

त्यामूळे ती त्यालासोबत घेऊन पार्टीत जाऊ लागली. पुजानेच अक्षयची अनेक फिल्म प्रोड्युसर आणि डायरेक्टरसोबत ओळख करून दिली.

त्यांनतर अक्षयच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक ओळखी झाल्या होत्या. त्यामूळे त्याला चित्रपटांच्या ऑफर यायला सुरुवात झाली.

परंतु जेव्हा अक्षयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुर्णपणे यश मिळवले तेव्हा तो पुजापासून वेगळे झाला. अक्षयने बॉलीवूडमध्ये पर्दापण केले. त्यावेळी पुजा मॉडेलिंग करत होती.

अक्षय कुमारने फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली. असे बोलले जाते की फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळाल्यानंतर अक्षयने पुजाची साथ सोडून दिली.

अक्षय कुमार चित्रपटांमध्ये खुप पुढे निघून गेला. तर पूजा बत्रा आपल्या करियरमध्ये जास्त प्रगती करू शकली नाही. तिने ‘विरासत’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

त्यानंतर तिने हसीना मान जाएगी, कहीं प्यार ना हो जाए, जोड़ी नंबर 1, नायक, परवाना, इत्तेफाक, हम तुम शबाना, भाई, साजिश आणि चंद्रलेखा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला जास्त यश मिळत नव्हते.

त्यामूळे तिने फिल्म इंडस्ट्रीपासून दुर जाण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये पुजा बत्राने लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. ते दोघे वेगळे झाले.

महत्वाच्या बातम्या
या नागरीकांना मिळणार नाही कोरोना लसीचा दुसरा डोस; सरकार लसीकरणाची रणनिती बदलण्याची शक्यता
वा रं मर्दा! अभिनेता रुग्णवाहिका चालवून रुग्णांची करतोय सेवा; दिवसरात्र करतोय रुग्णांची मदत
डॉक्टर नाही देवचं! पीपीई किट काढून डॉक्टरने शेअर केला फोटो; अवस्था पाहून डोळे पाणावतील
धक्कादायक! कोरोना रुग्णाला फक्त २५ किलोमीटर नेण्यासाठी रुग्णवाहिका चालाकाने घेतले ४२ हजार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.