Share

३६ रुपयांचा शेअर पोहोचला ६७१ रुपयांवर, १ लाखाचे झाले तब्बल १८ लाख, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

shear-market

कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजार हादरला होता. या काळात शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून आली होती. पण कोरोना महामारीनानंतर शेअर बाजार आता पूर्वपदावर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शेअर बाजारातील(Shear Market) अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. २०२२ या आर्थिक वर्षांमध्ये शेअर बाजारातील १९० समभागांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.(This 36 rupees shear gives huge profit to investor )

या १९० समभागांच्या यादीत बोरोसिल रिन्यूलस या कंपनीच्या शेअर्सचा देखील समावेश आहे. दोन वर्षात या बोरोसिल कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. दोन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत ३६ रुपयांवरून ६५० रुपये झाली आहे. या कालावधीत बोरोसिल कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे १७२५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

एका महिन्यापूर्वी या समभागाची किंमत ५५७.५० रुपये प्रति शेअर होती. ती वाढून आता ६५० रुपये प्रति शेअर झाली आहे. एका महिन्यात या समभागामध्ये १६.५० टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत ३३० रुपये होती. सहा महिन्यांमध्ये बोरोसिल कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे.

एका वर्षांपूर्वी या समभागाची किंमत २४५ रुपये प्रति शेअर होती. आज या समभागाची किंमत वाढून ६५० रुपये प्रति शेअर झाली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ९ एप्रिल २०२० रोजी NSE मध्ये या शेअरची किंमत ३५.७० रुपये होती. आज ती वाढून ६५० रुपये झाली आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना १७२५ टक्के परतावा दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज आज त्या गुंतवणूकदाराला १.१६ लाख रुपये मिळाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला २ लाख रुपये मिळाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या कंपनीवर विश्वास ठेवला असता आणि या कंपनी शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला १८.२५ लाख रुपये मिळाले असते. बोरोसिल रिन्यूलस ही सौर ग्लासची निर्मिती करणारी कंपनी आहे. केंद्र सरकार सध्या सौर उर्जेवर भर देत आहे. त्याचा फायदा बोरोसिल रिन्यूलस कंपनीला झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
”विराट कोहली, बाबर आझम आणि नऊ लाकडाचे तुकडे द्या, याच्यातच वर्ल्ड कप जिंकून दाखवेन”
चहलची कामगिरी पाहून धनश्री झाली भलतीच खुश, आनंदाच्या भरात केलं असं काही की.., पहा व्हिडीओ
“विविध राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदी भाषेत बोलावे”; अमित शहांचे आवाहन

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now