दिल्लीत कोरोनाच्या संख्येने पुन्हा एकदा घेतली उसळी; कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली

मुंबई | देशभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूचा वेग आता मंदवताना पाहायला मिळत आहे. अलीकडे मिळालेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांचा संख्या देखील कमी होताना दिसतं आहे. तर दुसरीकडे दिल्लीत करोनाच्या संख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. ‘दिल्लीत करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माझ्या मते आपण याला तिसरी लाट म्हणून शकतो. आम्ही सातत्यानं परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आणि घाबरण्याची गरज नाही. आवश्यक ती सर्व पाऊलं आम्ही टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील कोरोना परिस्तिथीबाबत सांगताना पुढे केजरीवाल म्हणतात, ‘कोरोना रुग्णांवर उपचारासाठी दिल्लीत पुरेसे बेड आहेत. काही खासगी रुग्णालयात आयसीयू बेडची संख्या कमी आहे, ती एकदोन दिवसात सोडवली जाईल,” असे केजरीवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, दिल्लीत अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाली आहे. मंगळवारी दिल्लीत दिवसभरात तब्बल ६ हजार रुग्ण आढळून आले होते. दिल्लीत प्रथमच इतकी मोठी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. यामुळे आता दिल्लीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ५,३३,७८७ असून आतापर्यंत एकूण ७६,५६,४७८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच करोनाने आतापर्यंत एकूण १,२३,६११ इतके बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
‘नववीत असताना मी अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले; आज करवा चौथला त्याचं फळ मिळालं’
‘अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना’
अर्णबला भेटायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी उचलून फेकून दिले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.