Brazil : एक कपल कारमध्ये बसून रोमान्स करत असताना त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हे कपल कारमध्ये रोमान्स करत होते. त्यावेळी काही चोर त्यांच्या कारजवळ आले आणि ते त्या कपलचे पैसे व कपडे घेऊन पळून गेले.
ही घटना ब्राझीलमधील आहे. एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये हे कपल रोमान्स करत होते. त्यावेळी त्यांच्या कारच्या जवळ एक चोरांची टोळी आली. त्यांनी त्या कपलचे पैसे आणि कपडे चोरले व त्यांना तशाच अवस्थेत रस्त्यावर सोडून कार घेऊन पळून गेले. ही घटना १७ ऑगस्ट रोजी घडली.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. एका अज्ञात जागी ही कार उभी होती. एक कपल कारच्या आतमध्ये होते. या कारवर चोरांनी हल्ला केला. यातील एकाने जबरदस्तीने कारचा दरवाजा उघडला, तर दुसऱ्याने जोडप्याचे सामान हिसकावून घेतले. चोरांना कपलने विरोध केल्यावर ते त्यांना धमक्या देऊ लागले.
ही घटना एवढ्यावरच संपत नाही तर, चोरट्यांनी या कपलला बाहेर काढले व त्यांची कार घेऊन पळून गेले. कार घेऊन जात असताना त्यांचे कपडे चोरांनी खिडकीच्या बाहेर टाकले. त्यानंतर कपलने लगेच त्यांचे कपडे घातले.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे व ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोरांनी कारवर हल्ला केल्याचे दिसत आहे. तसेच त्यातील जोडप्याला ढकलत त्यांची कार पळवून घेऊन गेले आहेत.
या घटनेबद्दल कळताच पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये सार्वजनिक ठिकाणी संबंध ठेवणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या जोडप्याला दंडा भरण्यासोबतच तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
महत्वाच्या बातम्या
दादा भुसे यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला राडा; ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत दाखवले काळे झेंडे
बिनकामाचा खर्च करता, जेवन देता, फ्लेक्स लावता पण कामे काहीच करत नाही; बापटांनी फडणवीसांसमोरच झापले
Ajit Pawar : बबनराव पाचपुतेंना धडा शिकवण्यासाठी अजित पवारांनी टाकला मोठा डाव; पाचपुतेंच्या पोटात गोळा
आता राज ठाकरेच घेणार शिवसेनेचा दसरा मेळावा? ‘त्या’ पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ