सांगली जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चोरट्याने भर सभेत स्टेजवरून शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून पन्नास हजार रुपयांचा बंडल लंपास केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.(thief-gate-cash-from-pocket-of-shivsena-politician-viral-video)
नुकताच सांगलीमध्ये ओबीसी(OBC) समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंत्री विजय वड्डेटीवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वड्डेटीवार यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यावेळी अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर जमले होते.
त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संजय विभुते यांच्याकडे होती. एका चोरट्याने व्यासपीठावरील या गर्दीचा फायदा घेतला आणि संजय विभुते यांच्या खिशातील ५० हजार रुपये चोरले. कार्यक्रम संपल्यानंतर संजय विभुते त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यावेळी खिशात पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते परत कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यांनी पैशांचा शोध घेतला. पण त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. कार्यक्रमातील व्यासपीठावरील व्हिडिओ पाहत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढल्याचे संजय विभुते यांच्या निदर्शनास आले.
यानंतर शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी या प्रकरणात पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली आहे. सांगली पोलिसांनी या प्रकरणात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून त्या चोराचा शोध सुरु आहे. चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
एका राजकीय नेत्याच्या खिशातून पैसे लंपास केल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या सरकारच्या पुढे मांडण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ओबीसी समाजाचे महत्वाचे नेते देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
लक्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास करत होता ‘हा’ अभिनेता, साधेपणाचे लोकांनी केले कौतुक
चहलचा IPL मध्ये धिंगाना! बायको धनश्रीला मैदानावरच दिला किस; पहा व्हायरल व्हिडीओ
‘या’ कायद्याच्या आधारे ईडी करत आहे आघाडीच्या मंत्र्यांवर कारवाया; जाणून घ्या काय आहे PMLA कायदा