Share

Korean girl : कोरियन तरुणीच्या मदतीसाठी धावून आले ‘हे’ दोन तरुण; वाचा त्या रात्रीची खरी इनसाईड स्टोरी

Korean girl : महाराष्ट्रातून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मुंबई येथे कोरियन महिलेसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे. कोरियन युट्यूबरच्या लैंगिक छळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, महिला युट्यूबर दक्षिण कोरियाची नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईतील खार भागात एका कोरियन व्लॉगरचा दोन जणांनी विनयभंग केला. ही घटना मंगळवारी घडली, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खार पोलिस स्टेशनने या प्रकरणाची दखल घेतली. यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी भादंवि कलम 354 अंतर्गत अटक केली.

जेव्हा ते दोन तरुण कोरियन तरुणीशी छेडछाड करत होते तेव्हा एक मुलगा तिथे येऊन त्या कोरियन तरुणीची त्या दोघांच्या छेडछाडीतून तिची सुटका करतो. तर दुसऱ्या तरुणाने या घटनेचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचवला. दोघा आरोपींना पकडून देण्यात व कोरियन महिलेची मदत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या तरुणीने दोन्ही तरुणांचे खास पद्धतीने आभार मानले आहेत. अथर्व आणि आदित्य अशी या दोन्ही तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला दक्षिण कोरियाची नागरिक असून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वास्तविक, त्यावेळी कोरियन महिला YouTuber उपनगरीय खार भागात लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक तरुण महिलेकडे येतो आणि तिने विरोध करूनही तिचा हात धरून तिला खेचण्यास सुरुवात केली. तरूण महिलेवर जबरदस्ती करताना दिसत आहे.

महिला स्वतःचा बचाव करते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण तो तरुण तिथेच थांबत नाही, तो त्याच्या साथीदारासह बाईकवर तिचा पाठलाग करताना दिसतो आणि महिलेला त्याच्या मोटरसायकलवरून घरी सोडण्यास सांगतो. तर महिलेने त्याची ऑफर नाकारली.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपी मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी यांना लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
Golden Guys : ७ कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल सोन्याचीच कार; पुण्याचे गोल्डन गाईज जगतात ‘असे’ लाइफ, वाचून चकीत व्हाल
Udddhav thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वच्या सर्व जागा जिंकत केला भाजप शिंदे गटाचा सुपडा साफ; पहा कुठे घडला हा चमत्कार
अवघ्या १९ वर्षांच्या मुलीने पुर्ण केला NASA चा खडतर प्रोग्राम; ठरली असा पराक्रम करणारी पहिली भारतीय

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now