बडे लोग बडी बाते! ‘या’ लोकांच्या बाॅडीगार्ड व ड्रायव्हर्सचे पगार ऐकून डोळे पांढरे होतील

‘बडे लोग बडी बडी बाते’ ही म्हण प्रत्येक श्रीमंत माणसांवर शोभेल अशी आहे. भारतामध्ये देखील अशी अनेक श्रीमंत माणस आहेत. जे त्यांचे आयूष्य खुप आरामात जगत आहेत.

या श्रीमंत लोकांमध्ये बॉलीवूड कलाकारांचे देखील नाव येते. इथे सर्वच गोष्टी खुप महाग आहेत. कलाकारांची आयुष्य जगण्याची पद्धत खुप वेगळी असते.

सर्वांना माहीती आहे की बॉलीवूड कलाकारांची लाईफस्टाईल खुप महाग आहे. त्यांचा दिवसाचा खर्च लाखो रुपयांमध्ये होतो.

कलाकारच नाही तर भारतातील प्रत्येक श्रीमंत व्यक्तिंच्या सगळ्याच गोष्टी खुप महाग आहेत. त्यांच्याकडे कामाला असलेल्या प्रत्येक माणसाचा पगार खुप जास्त आहे.

या लोकांच्या घरातील आया आणि अंगरक्षक आहेत. ज्यांचा मासिक वेतन सुशिक्षित लोकांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. यात अंबानीच्या ड्रायव्हरपासून ते अमिताभ बच्चनच्या बॉडीगार्डचा समावेश होतो.

चला तर मग जाणून घेवूया या लोकांच्या घरी कामाला असलेला आया आणि आंगरक्षकांना किती पगार मिळतो.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या पगाराबद्दल जाणून घेऊया. शेरा गेली अनेक वर्षे सलमान खानसोबत आहे. सलमानसाठी देखील तो खुप खास आहे.

सलमान बॉडीगार्ड शेराला दर महिन्याला १६ लाख रुपयांचा पगार देतो. त्यानुसार शेराचा वार्षिक पगार सुमारे २ कोटी आहे. हा पगार कोणत्याही डॉक्टर इंजिनिअरपेक्षा कमी नाही.

बॉलीवूडचा आणखी एक खान म्हणजे शाहरुख खान. शाहरूख खानचा बॉडीगार्ड बॉलीवूडच्या सर्वात महागड्या बॉडीगार्डपैकी एक आहे. अजय सिंह गेली कित्येक वर्षे शाहरुख खानचे रक्षण करत आहे.

शाहरुख त्याच्या बॉडीगार्डला वर्षभर अडीच कोटी रुपयांचा पगार देतो. त्याचा हा बॉडीगार्ड बॉलीवूडचा सर्वात महाग आणि विश्वासू बॉडीगार्ड आहे.

बॉलीवूडच्या आणखी एका विश्वासू बॉडीगार्डबद्दल आपण जाणून घेऊयात. हा बॉडीगार्ड आहे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा.

जितेंद्र शिंदे अमिताभ बच्चन यांचा रक्षक आहे. जितेंद्र शिंदेला अमिताभ बच्चन दर वर्षी दिड कोटी पगार देतात. हा पगार खुप जास्त आहे.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर मीडियामध्ये खुप प्रसिद्ध आहे. त्याचे मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत.

तैमुरचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या आयाला महिन्याला लाखो रुपये दिले जातात. तिला दरमहा पगाराच्या स्वरूपात दीड लाख रुपये दिले जातात. जर तिने ओव्हरटाईम काम केला तर ही रक्कम १.७५ लाख होते.

आत्ता जाणून घेऊया भारतातील सर्वात श्रीमंत घरण्याविषयी म्हणजेच अंबानी कुटुंबाविषयी. अंबानी कुटुंबाच्या ड्रायव्हरला महिन्याला २ लाख रुपये पगार देतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.