१८ वर्षांपेक्षा जास्त वय असले तरी ‘या’ लोकांनी कोरोना लस घेऊ नये; जाणून घ्या कारण…

देशभरा कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. रोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह भेटत आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी देशात लसीकरणही सुरु आहे.

आता १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरीकांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. पण अशात काही लोक आहे, ज्यांचे आरोग्य ठिक नाही, अशा लोकांनी लगेच लस घेतली नाही पाहीजे, चला तर मग जाणून घेऊया अशा काही लोकांबद्दल ज्यांनी कोरोना लस लगेच लस घेतली नाही पाहिजे.

कोरोना लसींबाबत अनेक लोकांच्या मनात भिती आणि शंका आहे. कारण अनेक लोकांमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट दिसून आले आहे. इतकेच नाही तर काही लोकांचा मृत्यु पण झाला आहे.

सध्या भारतात दोन प्रकारच्या लसी वापरल्या जात आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड, अशात आरोग्य मंत्रालयाकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे, की कोणी कोरोना लस घेतली नाही पाहिजे.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की कोरोना लसीला इंटरचेंज नाही केले जाऊ शकत. म्हणजेच पहिला आणि दुसरा डोस एकाच कोरोना लसीचा घेणे गरजेचे आहे. मग ती कोविशिल्ड असो कोव्हॅक्सिन.

१.१८ पेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली नाही पाहिजे. गरोदर महिलांनी आणि ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिलांनी कोरोना लस घेतली नाही पाहिजे. या महिलांना कोरोना लस घेणाऱ्या लोकांमध्ये यामुळे समाविष्ट करण्यात आलेले नाही, कारण या महिलांवर कोरोना लसीचा काय प्रभाव होईल याची अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

२. ज्या व्यक्तींना कोरोना लसीची ऍलर्जी असेल, म्हणजेच पहिला डोस घेतल्यानंतर ऍलर्जी झाली असेल, तर त्या लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेऊ नये.

३.ज्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत असेल किंवा कोरोना संक्रमित असेल, तर त्या लोकांनीही कोरोनाची लस घेतली नाही पाहिजे. रुग्णांनी या संक्रामणातून पुर्ण बाहेरल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी कोरोना लस घ्यावी.

४.ज्या लोकांना ताप, रक्ताशी संबंधित काही आजार, तसेच कोणताही रुग्ण ब्लड थिनरचे औषधं घेत असेल तर त्या लोकांनी कोरोनाची लस घेतली नाही पाहिजे.

५.ज्या कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीने उपचार करण्यात आले, किंवा अँटीबॉडीजच्या मदतीने उपचार केले जात आहे, त्या लोकांनी रिकवर झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यानंतर कोरोनाची लस घ्यावी.

६. ज्या लोकांना प्लेटलेट्सचा आजार आहे किंवा ज्या लोकांचे इम्युनिटी सिस्टिम खुप कमजोर असेल आणि जे यासाठी औषधे घेत असेल, त्या लोकांनीही सध्या कोरोनाची लस घेतली नाही पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय महिला सार्वजनिक ठिकाणी शारीरीक संबंध का ठेवत नाही?, ऐश्वर्याने दिले ‘असे’ उत्तर
‘त्या’ पत्रानंतर मोठ्या घडामोडींचे वेग! कोणत्याही क्षणी परमबीर सिंग यांना अटक होण्याची शक्यता
देश छोटा असला तरी ह्रदय मात्र मोठं! ‘या’ छोट्याश्या देशाने भारताला पाठवले २०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.