लालसिंग चड्ढा, बेलबॉटमसोबतच ‘या’ चित्रपटांची रिलीज डेट ठरली; पुढच्या वर्षी ‘या’ तारखेला होणार रिलीज

गेल्या कित्येक दिवसांपासून आपण सर्वांनी एखाद्या सणाला सिनेमागृहात जाऊन एकही सिनेमा पहिला नाही. त्यामूळे आपल्या सर्वांना या गोष्टीची खुप आठवण येत होती.

पण आपली ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आपण लवकरच सिनेमा गृहात जाऊन चित्रपट पाहणार आहोत. याची पुर्ण तयारी झाली आहे.

सध्या कोरोनामूळे देशातील सर्व चित्रपटगृह बंद आहेत. त्यामूळे अनेकजण चित्रपटगृहे उघडण्याची वाट बघत आहेत. पण त्यांना यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

प्रेक्षक अनेक चित्रपटांची वाट आतुरतेने बघत आहेत. अनेक मोठे आणि छोटे सिनेमे चित्रपटगृहे उघडण्याची वाट बघत आहेत. तर काहींनी या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग स्वीकारला आहे.

पण काही चित्रपट खुप महत्त्वाचे आहेत. त्या चित्रपटांचे बजेट देखील खुप जास्त आहे. त्यामुळे त्या चित्रपटांच्या निर्मात्यांना ओटीटीवर चित्रपट रिलीज करणे परवडणारे नाही.

कारण एवढ्या मोठ्या बजेटमध्ये तयार केलेला सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. तर मग तो तेवढी कमाई करू शकणार नाही. निर्मात्यांचे खुप मोठे नुकसान होईल.

या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. या वेळेमध्ये त्यांना चित्रपटाचे राहिलेले चित्रीकरण पुर्ण करता येईल.

चला तर मग या चित्रपटांची नावे जाणून घेऊयात. हि सर्व चित्रपट पुढच्या वर्षी सर्व सणांमध्ये रिलीज होणार आहेत. त्यामूळे २०२१ मधले सगळेच सण प्रेक्षकांसाठी खुप खास ठरतील.

१) मैदान – अजय देवगणचा चित्रपट ‘मैदान’ पुढील वर्षी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट २०२१ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होईल.

हा चित्रपट एक बायोपिक आहे. ज्यामध्ये अजय सुप्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आहेत.

२) लालसिंग चड्ढा – पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने आमिर खानचा चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग तुर्कीमध्ये सुरू आहे.

हा चित्रपट या वर्षी रिलीज होणार होता. पण कोरोनामूळे या चित्रपटाचे सगळे काम थांबले होते. पण आत्ता परत या चित्रपटाचे काम नव्याने सुरू झाले आहे.

३) ब्रह्मास्त्र – बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट देखील पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नागार्जुन अक्किनेनी हे मुख्य भुमिकेमध्ये दिसणार आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक नाही आणि चित्रपटाचे काम अद्याप बाकी आहे. त्यामूळे हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

४) राधे- मोस्ट वॉन्टेड भाई – हा चित्रपट सन २०२१ मध्ये ईदला रिलीज होऊ शकतो. १२ किंवा १३ मे ही तारीख सलमान खानच्या ‘राधे- मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटासाठी बुक करण्यात आली आहे.

चित्रपटात सलमानबरोबर दिशा पाटणी आणि रणदीप हूडा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे.

५) बेलबॉटम – अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाने २ एप्रिल २०२१ ची तारीख आधीच बुक केली आहे. हा चित्रपट ८० च्या दशकाच्या काही सत्य घटनांवर आधारित आहे.

यात अक्षय वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशीसोबत दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची खुप वाट पहात आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.