..त्यामुळे शिखर धवनने दोन मुलांची आई असलेल्या मुलीशी केले लग्न; वाचा गब्बरची लव्हस्टोरी

प्रेम आंधळे असते. कोणीही प्रेमापासून वाचू शकत नाही. असे म्हणतात प्रेमात माणस आंधळी होतात. ते त्यांच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतात.

राजकारणी, उद्योजक, अभिनेते, क्रिकेटर हे सुद्धा प्रेमापासून लपू शकले नाहीत. तर मग सामान्य माणूस प्रेमापासून कसा वाचू शकेल.

आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूची प्रेमकाहाणी सांगणार आहोत. त्यांची ही प्रेमकहाणी फेसबूकवरुन सुरु झाली आणि लग्नापर्यंत जाऊन पोहोचली.

ही प्रेमकहाणी आहे भारतीय क्रिकेट संघातील गब्बर म्हणजेच शिखर धवनची. शिखर धवन क्रिकेटसंघातील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे.

पण या सर्वोत्तम फलंदाजाची विकेट आयशा मुखर्जी या सुंदर मुलीने घेतली. शिखर आणि आयशाने २०१२ मध्ये लग्न केले. ते दोघे सुखाचा संसार करत आहेत.

या लव्ह स्टोरीची खास गोष्ट म्हणजे आयशाचे अगोदर लग्न झाले होते. तिला त्या लग्नापासून दोन मुली देखील आहेत. पण तरीही शिखरने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शिखर धवन हा क्रिकेट सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. पण वैयक्तिक आयुष्यात देखील तेवढाच सर्वोत्तम आहे हे त्याने सिद्ध केले आहे. धवनने २ मुलांच्या आईसह आणि ७ वर्ष मोठी असलेल्या महिलेशी लग्न केले.

आयशाचा जन्म भारतामध्ये झाला होता. पण त्यानंतर ती आई वडीलांसह ऑस्ट्रेलियामध्ये गेली. त्यानंतर ती तिथेच लहानाची मोठी झाली.

आयशा मुखर्जी लहानपणापासूनच सर्व प्रकारच्या खेळांमध्ये अव्वल होती. तिने रिंग बॉक्सिंग, टेनिस आणि क्रिकेट असे अनेक खेळ खेळले आहेत. आयशाला क्रिकेट आवडते आणि ह्याच आवडीमुळे तिची ओळख शिखरशी झाली.

फेसबुक वर आयशा हरभजन सिंगची म्युच्युअल फ्रेंड होती. ती त्याला भेटली होती. त्यानंतर आयशा आणि शिखर फेसबुकवर मित्र बनले.

मग काय यांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्या दोघांनी हळू हळू फेसबुकवर चॅटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे प्रेम सुरू झाले आणि चर्चा वाढू लागली.

पण त्यावेळी आयशाचा घटस्फोट झाला होता आणि ती दोन मुलांची आई होती. तिने शिखरला याबद्दल सांगितले आणि शिखरने तिला सांगितले की त्याला यात काही अडचण नाही.

कारण शिखर धवनचा प्रेमावर विश्वास होता. त्यामूळे त्याला कोणत्याही गोष्टीची अडचण नव्हती. त्याने आयशाला लग्नासाठी विचारणा केली.

त्यावेळी आयशाने थोडा वेळ विचार केला आणि लग्नाला होकार दिला. लग्नानंतर या दोघांना जोरावर हा गोंडस मुलगा देखील झाला.

शिखरला जेव्हा या विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, ‘आयशा त्याच्या आयूष्यात आल्यापासून त्याच्यामध्ये अनेक बदल झाले. तो खुप जबाबदार झाला आहे. आयशाने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आयशाने त्याला खूप काही शिकवले.’

तो पढे म्हणाला की, ‘जेव्हा तो क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास असमर्थ असेल. तेव्हा त्याला प्रशिक्षकांपेक्षा त्याच्या पत्नीची जास्त भीती वाटते.’

कारण आयशा आधी त्याला फटकारते आणि नंतर चांगल्या खेळासाठी काय करावे हे सांगते. त्यामूळे त्याला खेळामध्ये खुप मदत होते. आजच्या मुलांना अशा मुली आवडतात ज्यांचा कोणी प्रियकर नसतो.

पण या उलट शिखर धवनने अशी मुलगी आवडली जी आधीपासूनच विवाहित होती आणि ती दोन मुलांची आई देखील होती. एवढेच नव्हे तर शिखरने तिच्याशी लग्नही केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.