सुशांत केसच्या तपासासाठी मोदी सरकारने नियुक्त केले सीबीआयचे ‘हे’ चार टाॅपर; पहा कारकीर्द..

नवी दिल्ली | अभिनेता सुशांत सिंह राजपूत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे देण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची शून्यातून चौकशी होणार आहे. या तपासावर सीबीआयचे सहसंचालक दर्जाचे अधिकाऱ्याचे नियंत्रण राहणार आहे.

सहसंचालक, उपमहानिरिक्षक, उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक या दर्जाचा अधिकाऱ्याची उतरंड राहणार आहे. हा तपास करण्यासाठी दोन अधिकारी गुजरात केडरचे आहेत. दोन महिला अधिकारी आहेत.

सीबीआयचे सहसंचालक मनोज शशीधर हे या तपासावर सर्वोच्च देखरेख ठेवतील. ते मूळचे केरळचे असून 1994 च्या बॅचचे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली समितीने त्यांची सीबीआयमध्ये नियुक्ती केली.

पोलीस उपमहानिरिक्षक गगनदिप गंभीर यादेखील गुजरात केडरच्या अधिकारी आहेत. पंजाब विद्यापिठाच्या टॉपर असलेल्या गगनदीप यांनी ऑगस्टा वेसलँड खरेदीच्या गैरव्यवहार प्रकरण तपासले होते.

केंद्रीय केडरच्या अधिकारी नुपूर प्रसाद त्या मूळच्या बिहारच्या आहेत. सीबीआयमध्ये येण्याआधी त्या दिल्लीमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत होत्या. गेल्या वर्षी त्यांची सीबीआयमध्ये नियुक्ती झाली.

सीबीआयमध्ये अतिरिक्त अनिल यादव पोलीस अधीक्षक हे मुख्य तपासाचे पुरावे गोळा करण्याचे काम करणार आहेत. सीबीआयमध्ये अनेक महत्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळालं आहे.

दरम्यान, या चार अधिकाऱ्याकडे सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी आहे. ईडीने या प्रकरणाच्या अर्थिक मुद्द्यांचा तपास सुरु केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.